*प्रा. गंगाधर चेपूरवार लिखित दासरी काव्यसंग्रहाचे पुस्तक विमोचन सोहळा संपन्न*:-
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
- नांदेड जिल्ह्यातील व किनवट तालुक्यातील जलधरा या गावात दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी प्रत्यक्ष आठवडी बाजारात दासरी समाज बांधवाच्या दुकानावर जाऊन प्रा. गंगाधर नरसिंगराव चेपूरवार सोनू कवी यांच्या पहिल्या मराठी दासरी काव्यसंग्रहाचे पुस्तक विमोचन करण्यात आले असून,
"दासरी या काव्यसंग्रहाचे विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातीत चाळीस व्या क्रमांकावर असलेल्या माला दासरी या समाजाची माहिती असणारे हे पहिलेच लिखित पुस्तक होय, व त्यातही दासरी हा काव्यसंग्रह समाज चळवळीच्या कविता असणारा काव्यसंग्रह होय, औरंगाबाद येथील लोकप्रिय शब्दगंध समुह प्रकाशनने अतिशय सुंदर रित्या व कमी वेळात हा दासरी काव्यसंग्रह प्रकाशित केला असून, दासरी समाजाच्या व्यथा मांडणारा हा केवळ काव्यसंग्रह नसून तर सामाजिक न्याय हक्कांचा मागणीसंग्रह आहे, कारण माझ्या दासरी समाजाची व्यथा प्रथा कथा जेथुन सुरू होते तिथुन माझे साहित्यिक कार्य सुरू होते असे अशी प्रतिक्रिया प्रा. गंगाधर चेपूरवार ह्यांनी दिली आहे".
यावेळी प्रा.गंगाधर चेपूरवार यांच्यासह हनमानलू वानपत्रे, नारायण आल्लडवार, रामदास आल्लडवार, नरसिंम्हा आल्लडवार,नरसिंमलू यंगलवार, प्रभाकर आल्लडवार, प्रवीण आल्लडवार,कमलकिशोर गरड, वैभव यंगलवार, बालाजी आल्लडवार, अजय आल्लडवार, शैलेश आल्लडवार आदी समाज बांधवाच्या उपस्थितीत दासरी पुस्तक विमोचन सोहळा संपन्न झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा