Breaking

बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१

छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम लवकर पूर्ण होणार- नगराध्यक्ष श्री सचिन (भैय्या) रोचकरी*


*छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम लवकर पूर्ण होणार- नगराध्यक्ष श्री सचिन (भैय्या) रोचकरी*

   तुळजापूर शहरातील वैभव छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम लवकारात लवकर पूर्ण करून पुतळा उभा करण्याबाबत आज दि २२-०९-२०२१ रोजी औरंगाबाद चा दौर. 

               छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळा (मुर्ती) चे फिनीशिंग कलर काम आदी कामाबाबत सबंधीत एजन्सी धारकाची समक्ष भेट घेऊन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा तसेच डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळा बाबत सविस्तर  चर्चा करुन सदरील महाराजांची मुर्ती (पुतळा) लवकरात लवकर सर्व कामे करुन तुळजापूर शहरा मध्ये आणले जावे. जेणे करुन छत्रपती शिवाजी महाराज चौका मधील होत असलेल्या चबुतर्‍या वरती लवकरात लवकर विराजमान  करता येईल.
    त्या अनुशंगाने प्रयत्न चालु आहेत.तसेच डाँ बाबासाहेबांच्या ही पुतळ्याबाबत लवकरात लवकर पुतळा फिनिशिंग, कलर काम करुन घ्यावे असे संबंधीत एजन्सी धारकास सुचीत करण्यात आले योग्य  त्या सूचना देण्यात आल्या.या पहाणी व चौकशी दौर्‍यात  माझ्या समवेत  नगरसेवक पंडीतराव जगदाळे,विजय (आबा) कंदले,विशाल रोचकरी,बाळासाहेब सानप इ. उपस्थित होते.

प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा