Breaking

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

आवार पिंपरीत लसीकरणला नागरिकांचा मोठा प्रतिसाद जनजागृती साठी ग्रामपंचायत चा पुढाकार




आवार पिंपरीत लसीकरणला नागरिकांचा मोठा प्रतिसाद जनजागृती साठी ग्रामपंचायत चा पुढाकार 



परंडा :- आसू  प्रथमीक आरोग्य केद्रा अंतर्गत आवार पिंपरी येथील नागरीकांसाठी प्रथम डोस साठी २०० तर द्वितीय डोस साठी  १०० कोव्हिशील्ड लसीकरण करण्याचे नियोजन दि ८ सप्टेबर रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात आले होते.
        आसु प्राथमीक आरोग्य केद्रा अतर्गतआवार पिंपरी येथील नागरीकांचे लसीकरण करण्यासाठी प्रथम डोस घेनाऱ्या नागरीकांसाठी २०० तर द्वितीय डोस घेनाऱ्या नागरीकांसा साठी १०० डोस देण्याचे नियोजन केले असल्याची माहीती अरोग्य विभागाने दोन दिवसा पूर्वीच ग्रामपंचायत प्रशासनास दिली होती.या सुचानाच्या अनुशंगाने ग्रामपंचायत प्रशासनाने देखील गावातील नागरिकांना 8 तारखेला लसीकरण  असल्याचे सुचवले त्यामुळे  गावातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण केले  मागच्या लसीकरण वेळी गावात लसीकरण  आयोजित कारण देखील नागरिकांनी लसीकरण करण्याकडे पाठ फिरवली मात्र  यावेळी गावचे माजी सरपंच सुरेश डाकवाले ,सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य यांनी यावेळी पुढाकार घेत गावातील नागरिकांना लसीकरण करण्यास सांगितले  त्यामुळे गावातील नागरिकांनी आरोग्य विभागाचे अधिकारी ,कर्मचारी येण्याअगोदर गावातील शाळेत येण्यास सुरुवात केली त्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणात झाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा