Breaking

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

टेंभुर्णी मध्ये रोटरी क्लब टेंभुर्णी च्या पुढाकाराने रोट्रॅक्ट क्लब स्थापन. अध्यक्षपदी यश गांधी तर सचिवपदी सौरभ कोकीळ*



*टेंभुर्णी मध्ये रोटरी क्लब टेंभुर्णी च्या पुढाकाराने रोट्रॅक्ट क्लब स्थापन.  अध्यक्षपदी यश गांधी तर सचिवपदी सौरभ कोकीळ*



टेंभुर्णी प्रतिनिधी/अमोल भोसले 

 टेंभुर्णी (प्रतिनिधी) टेंभुर्णी मध्ये रोटरी क्लब टेंभुर्णी च्या पुढाकाराने रोट्रॅक्ट क्लब स्थापन करण्यात आला.तसेच एकमताने अध्यक्ष पदी निवड झालेल्या यश गांधी यांनी अध्यक्ष पदाचा तर तर सचिवपदी सौरभ कोकीळ यांनी पदभार स्वीकारला.

रोटरी क्लब टेंभुर्णी कडून गेली दोन वर्षं रोट्रॅक्ट क्लब स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. 18 ते 30 वयोगटातील तरुण पिढी वर ही रोटरी च्या माध्यमातून सामाजिक कार्य, शैक्षणिक, सांस्कृतिक असे संस्कार त्यांचे वर व्हावेत या उद्देशाने रोट्रॅक्ट क्लब ची स्थापना केली जाते.  त्याचाच एक भाग म्हणून टेंभुर्णी मध्ये रोट्रॅक्ट क्लब ची स्थापना करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रीक्ट चे माजी प्रांतपाल रो.विष्णु मोंढे व डिस्ट्रीक्ट सेक्रेटरी श्रीराम कुलकर्णी हे उपस्थित उपस्थित होते. श्री मोंढे यांचे हस्ते नूतन अध्यक्ष व सचिव यांना सनद प्रदान करण्यात तसेच आली तसेच नूतन सदस्य हनुमंत तावरे,आकाश पवार , रत्नदीप भालेराव , सय्यम चांकेश्वरा , शुभम कल्याणी , ओंकार रावळ , सम्यक शहा , यश कोठारी , संकेत राजमाने , अजिंक्य गांधी , महावीर भालेराव , हर्षल शहा , सार्थक सलगर , योगीराज कोकीळ , सुमित बाबर , ईशान गांधी , नीरज सपाटे , अमेय सपाटे  यांना रोटरी पिन देऊन सन्मानित करण्यात आले  श्रीराम कुलकर्णी  व श्री. विष्णु मोंढे यांनी नूतन पदाधिकारी व सदस्य यांना समर्पक शब्दात मार्गदर्शन केले तसेच रोटरी च्या अनेक उपक्रमाची माहिती दिली.या वेळी नूतन अध्यक्ष यश गांधी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमास  साठी गावातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. रोटरी क्लबचे सचिव सुजित बेलपत्रे,रमेश पाटील, नागेश बोबडे, विनोद शिंदे, बाळासाहेब सपाटे,दीपक व्यवहारे, श्रीकांत लोंढे, अनिल मस्के, यशवंत हांडे, डॉ. पांडुरंग गायकवाड, दिलीप वेदपाठक,बंडू रावळ, किशोर सलगर, संदीप जाधव, महेश कोठारी, योगेश भणगे,महेश कोकीळ, किशोर तळेकर, अनिल बाबर, रणजित बोत्रे, पारस कटारिया आदी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरी क्लबचे माजी सचिव सचिन होदाडे व संदीप मोकाशी यांनी केले तर आभार सौरभ कोकीळ यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा