Breaking

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

रयत क्रांती संघटना करणार तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन: प्रा.सुहास पाटील




रयत क्रांती संघटना करणार तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन: प्रा.सुहास पाटील



टेंभुर्णी प्रतिनिधी/अमोल भोसले


गत ऊस हंगामातील जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी त्यानुसार बिले दिलेली नाहीत यासाठी रयत क्रांती संघटना सर्व तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हा संपर्कप्रमुख प्रा सुहास पाटील यांनी दिली यामध्ये संघटनेची जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ज्या साखर कारखान्यांनी एफआरपी अनुसार ऊस बिले दिल नाहीत अशा कारखान्यांवर आर आर सी कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिलेल्या आहेत परंतु अद्यापपर्यंत तहसीलदारांनी कोणत्याच साखर कारखान्यावर एफ आर पी अनुसार ऊस बिले देण्याविषयीची कारवाई केलेली नाही. त्यामुळे सर्व तहसील कार्यालयासमोर कारखानदारांचा व तहसीलदारांचा निषेध म्हणून भजन आंदोलन करण्याचे सर्वानुमते बैठकीमध्ये ठरले.

मंगळवार दिनांक 28 रोजी माढा व करमाळा बुधवार दिनांक 29 रोजी मोहोळ पंढरपुर दिनांक 30 सप्टेंबर दक्षिण व उत्तर सोलापूर तर 1 ऑक्टोंबर रोजी माळशिरस व मंगळवेढा तहसील कार्यालय समोर रयत क्रांती संघटनेच्या वतीने भजन आंदोलन करण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा