झुंजार गणेश मडळा तर्फे अकलूज रोड येथील गोविंद वृद्धाश्रम महाप्रसादाचे वाटप.
शुक्रवार पेठ टेंभुर्णी येथील झुंजार गणेश मंडळाचा गणेशाची आरती व महापूजा जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांचे सुपुत्र कृष्णा शिंदे यांचा शुभ हस्ते करण्यात आली.नंतर झुंजार गणेश मडळाचे नेते पैलवान अमोल मदने यांचा हस्ते कृष्णा शिंदे यांचा मंडळाचा वतीने सत्कार केला.अकलूज रोड नजिक
गोविंद वृद्धाश्रम येथै जावुन महाप्रसादचे वाटप मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आला.
झुंजार गणेश मंडळ हे टेंभुर्णी तील फार जुनी व वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवणारे मंडळ आहे.प्रत्येक वर्षी मंडळाच्यावतीने बाराव्या दिवशी टेंभुर्णी मध्ये वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम दाखवले जातात व तसाच प्रतिसाद टेंभुर्णी व टेम्भूर्णी परिसरातील लोक त्यांना देतात.परंतु सध्या covid-19 या रोगामुळे अतिशय साध्या पद्धतीने गणेशाचे विसर्जन करण्यात आले.कोणतीही मिरवणूक काढण्यात आली नाही. सोशल डिस्टन्स या नियमाचे पालन करून विसर्जन करण्यात आले.या वेळी मंडळातर्फे शाळेतील मुलांना बुद्धीला चालना मिळण्यासाठी हिंदी दिनानिमित्त हिंदी निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये टेंभुर्णी टेंभुर्णी परिसरातील जवळपास 427 मुलांनी सहभाग नोंदविला अशी माहिती मंडळाचे कार्यकर्ते संकेत कोठारी यांनी दिली.यावेळी अमोल मदने, निखील लाखोळे,संकेत कोठारी,बाळ काका कोकीळ,प्रफुल्ल लाकोळे,ओंकार मदने,सचिन सुक्रे, वैभव यादव,सचिन जाधव,शुभम कोठारे,अनुज कोठारी,विलास कांबळे,साहिल तांबोळी,संदीप भालेराव,निरंतर आरव लाकोळे, लक्ष्मण मदने इत्यादी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा