एफ आर पी चा प्रश्न तात्काळ निकाली काढला नाही तर सहकार मंत्र्याची गाडी फोडणार:दत्ता मस्के पाटील
पुणे प्रतिनिधी/AJ 24 Taas network
आज सोलापूर प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने पुणे येथे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना गेल्या गळीत हंगामातील थकीत एफआरपी आणि येणाऱ्या गळीत हंगामातील एफ आर पी रक्कम तीन टप्प्यात न मिळता एक रकमी मिळावी,या संदर्भात निवेदन देण्यात आले, येणारा ऊस गळीत हंगाम सुरू होण्याच्या अगोदर तात्काळ एफ आर पी चा प्रश्न निकाली काढला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आंदोलन उभे करून सहकार मंत्र्याची ची गाडी फोडणार असा इशारा देण्यात आला.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी कार्याध्यक्ष खालिद मणियार पंढरपूर तालुका अध्यक्ष नाना इंगळे बापू मोहिते किशोर सावंत आदीजण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा