Breaking

सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१

संभाजी ब्रिगेड आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार



संभाजी ब्रिगेड आगामी नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवणार

पंढरपूर प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा (पंढरपूर विभाग)ची जिल्हा कार्यकारणी बैठक शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे संपन्न झाली.यामध्ये आगामी काळात होऊ घातलेल्या नगरपालिका/ नगरपरिषद/जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका संभाजी ब्रिगेड भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी लढवेल व परिवर्तन घडवेल असा निश्चय  सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला. यावेळी रणजीत भाकरे-चव्हाण यांची नुतन जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली 
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे यांच्या उपस्थितीत अन्  जिल्हाध्यक्ष सचिन बापू  जगताप यांचे अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सचिव सुहास टोणपे,सर्व जिल्हा उपाध्यक्ष शंकरजी पोळ,अमोल दादा शेळके,अनिलजी यादव, सर्व जि.संघटक प्रमोदजी जगदाळे,गणेशजी सव्वासे सर्व तालुकाध्यक्ष बाळासाहेब बागल-पंढरपूर, अमित घोगरे-करमाळा, बालाजी जगताप-माढा, प्रताप बाबा इंगोले-सांगोला, समाधान क्षिरसागर-मंगळवेढा, पंढरपूर शहरध्यक्ष स्वागत कदम दिनेश जगदाळे
,मसेसं तालुकाध्यक्ष अतुल वारे, राजेश ननवरे, गणेश डोके, राजेश बाधले महाराज,मुन्ना भोसले,स्वप्निल गायकवाड, सचिन पराडे-पाटील,दिगंबर मिसाळ-पाटील,अमोल कुंभार, दादा बोडके, पप्पू देशमुख, शेखर आटकळे आकाश मांडवे,फिरोज कोरबु महादेव पवार,आकाश पवार,सिताराम नलवडे, महेश जाधव,रणजित देशमुख,अविनाश पाटील, अजय गायकवाड,शंकर नागणे, रामभाऊ पराडे,महेश जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा