*तुळजापूर नगर परिषदे मार्फत गणेश मूर्ती संकलनासाठी दोन टेम्पोची व्यवस्था, गणेशभक्तांनी सहकार्य करावे, नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी, यांचे आवाहन.*
तुळजापूर शहरातील सर्व गणेश भक्तांना नम्रतेचे आवाहन करण्यात येते की, तुळजापूर नगर परिषद मार्फत गणेश विसर्जन करिता मूर्ती संकलनासाठी शहरात दोन टेम्पो ची व्यवस्था केली आहे,तरी आपण आपल्याकडे येणाऱ्या वाहनांमध्ये मूर्ती देऊन नगरपरिषदेस सहकार्य करावे असे, आवाहन तुळजापूर नगरीचे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी यांनी केले आहे,यावेळी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, युवा नेते विनोद (पिटू) भैया गंगणे, दत्तात्रय साळुंखे, यांच्यासह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा