*प्रा शिवाजीराव सावंत सर यांच्या वाढदिवसानिमित्त 101 रक्तदान संपन्न*
टेंभुर्णी(प्रतिनिधी) अमोल भोसले यास कडून
AJ 24 Taas News Maharashtra
माढा तालुक्यातील आलेगाव बुद्रुक येथील भैरवनाथ शुगर च्या कारखाना कार्यस्थळावर शिवसेना जिल्हा समन्वयक तथा भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा. शिवाजीराव सावंत यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार भाजपाचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी प्रारंभी सर्वांच्या उपस्थितीत प्रा शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते केक कापण्यात आला. कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सरकारच्या रक्तदान करण्याच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुहास पाटील म्हणाले की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे रक्तदान करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण करावा व सर्वांनी रक्तदान करावे असे आव्हान करून रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी कवी शरद पाटील यांनी सावंत सरांच्या वाढदिवसानिमित्त कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी रयत क्रांती चे सुहास पाटील भाजपा तालुकाध्यक्ष योगेश बोबडे,शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे बाळासाहेब गाडे पाटील, पोपटतात्या अनपट, तानाजी गाडे पाटील जनरल मॅनेजर सुरेश पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते
रक्तदान शिबिर यशस्वीपणे करण्यासाठी असिस्टंट जनरल मॅनेजर आबासाहेब वाघ शेती अधिकारी विजय खटके ऊस पुरवठा अधिकारी तानाजी कदम मोहिते साहेब यांनी परिश्रम घेतले व सर्व रक्तदात्यांचे भैरवनाथ शुगर चे कार्यकारी संचालक पृथ्वीराज भैय्या सावंत यांनी आभार मानले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा