*जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेनेचाच विरोधकांनी लक्षात ठेवावे...आ. योगेश दादा कदम*
*जात, गोत्र आणि धर्म आमचा शिवसेनाच हे आमच्या विरोधकांनी लक्षात ठेवावे अशा शब्दांत विरोधकांना समज देत दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्मा. श्री. योगेशदादा कदम यांनी खेड शहर शिवसेना पदाधिकारी यांना दिली प्रेरणा.*
आमदार श्री. योगेशदादा कदम यांच्या अध्यक्षतेखाली खेड शहर शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना व युवती सेना पदाधिकारी, नगरसेवक यांची बैठक खेडमधील सभापती निवास येथे पार पडली.
*आपण पाहतोय वाचतोय कि काही दिवसांपासून ज्यांनी खेडचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात गौरवले व शिवसेनेचा झंझावात निर्माण केला अशा शिवसेना नेते सन्मा. श्री. रामदासभाई कदम यांच्यावर त्या बनावट ऑडीओ क्लिपद्वारे टिका करत आहेत पण आपण शिवसेनाप्रमुखांच्या ज्वलंत विचारांचे व शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री ना. श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काम करणारे कट्टर शिवसैनिक आहोत. ८० % समाजकारण व २० % राजकारण याप्रमाणे काम करतोय. परंतू ज्यांना आपल्या कामामुळे स्वत:चा राजकीय अस्तित्वाचा अंत दिसत असल्यामुळे फक्त आणि फक्त श्री. रामदासभाई कदम व मला लक्ष करुन १००% खालच्या थराचे राजकारण करत आहेत.*
*पण मला ठाम विश्वास आहे कि आपण यांना जोरदार प्रतिकार देत अधिक जोमाने काम सुरू ठेवू.*
*आपल्यावर कोणतेही संकट आले कि मग ते कोरोनाची महामारी असो, निसर्ग चक्रीवादळ असो, तौक्ते वादळ असो कि आत्ताच झालेली भयानक पूरस्थिती यामध्ये सन्मा. श्री. रामदासभाई कदम व मी आपणांसोबत सर्वांच्या पाठिशी ठामपणे उभे राहिलो आणि यापुढेही राहू.*
*जनतेला काही तरी बनावट दाखवायचे आणि सहानभूती मिळवायची हेच यांचे धंदे आहेत पण आत्ता मात्र यांचे हे मनसुबे पूर्णपणे उधळून लावून काही प्रमाणात यांचे अस्तित्व आपण संपवायचा निर्धार करुया आणि जात, गोत्र आणि धर्म आमचा शिवसेनाच हेच दाखवून देऊया अशा शब्दांत आमदार श्री. योगेशदादा कदम यांनी मनोगत व्यक्त केले.*
शिवसेना तालूकाप्रमुख श्री. विजय जाधव, माजी जि. प. बांधकाम समिती सभापती श्री. चंद्रकांत उर्फ अण्णा कदम, खेड शिवसेना शहरप्रमुख श्री. निकेतन पाटणे, महिला आघाडी शहरसंघटीका सौ. माधवी बुटाला, युवा सेना शहरअधिकारी श्री. सिध्देश खेडेकर, युवती सेना शहरअधिकारी पूनम जाधव, उपशहरप्रमुख श्री. सुरेश शेठ, उपशहरप्रमुख श्री. स्वप्निल सैतवडेकर, उपशहरप्रमुख श्री. अमोल दळवी, उपशहरप्रमुख श्री. जावेद कौचाली, शिवसेना गटनेते श्री. प्रज्योत तोडकरी, उपनगराध्यक्ष श्री. सुनिल दरेकर, नगरसेवक श्री. प्रशांत कदम, बांधकाम समिती सभापती सौ. सुरभी धामणस्कर, नगरसेविका सौ. नम्रता वडके, नगरसेविका सौ. मनिषा निर्मळ, नगरसेविका सौ. सिमा वंडकर, नगरसेवक श्री. अंकुश विचारे, माजी उपनगराध्यक्ष श्री. कुंदन सातपुते, माजी नगरसेवक श्री. मिनार चिखले, माजी नगरसेवक श्री. सतीश चिकणे, माजी नगरसेवक श्री. राजेश बुटाला, शहर सचिव श्री. पराग चिखले, विभागप्रमुख श्री. दिलीप सावंत, श्री. परेश चिखले यांसहित शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना व युवती सेना पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा