Breaking

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

पिलीव येथील आदित्य पाटील याची चंद्रपूर येथील सैनिक स्कुलमध्ये निवड




पिलीव येथील आदित्य पाटील याची चंद्रपूर येथील सैनिक स्कुलमध्ये निवड     







 पिलीव प्रतिनिधी - AJ 24 Taas News Maharashtra


माळशिरस तालुक्यातील पिलीव ( झिंजेवस्ती) येथील आदित्य सुभाष पाटील याची चंद्रपूर येथील सैनिक स्कुलमध्ये निवड झाली आहे. तो म्हसवड येथील मेरी माता इंग्लिश मेडीयम स्कुलमध्ये पाचवीमध्ये शिकत असतानाच शैक्षणिक वर्ष 2020-21  या शैक्षणिक सत्रासाठी झालेल्या पात्रता परीक्षेत त्याने हे यश मिळविले .संपूर्ण देशभरातुन दरवर्षी घेण्यात येणाऱ्या या परीक्षेत पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना लेखी व वैद्यकीय चाचणीला सामोरे जावे लागते .आदित्य चे वडील सुभाष पाटील हे पदवीधारक आहेत तर आई वर्षा पाटील हया ग्रुहीणी आहेत. ग्रामीण भागात असुनही आदित्य हयाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.निवड झाल्यानंतर आदित्य ने या परिक्षेसाठी माझे आई वडील, आजी आजोबा ,चुलते चुलती व शिक्षकांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे आदित्य ने सांगितले. हया यशाबद्दल आदित्य चे पिलीव व झिजेंवस्ती परीसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन अभिनंदन व कौतुक होत आहे.  फोटो - आदित्य पाटील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा