Breaking

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा मेळावा वेळापूर येथे संपन्न*



*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा मेळावा वेळापूर येथे संपन्न*


*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*


     
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हा मेळावा वेळापूर ता.माळशिरस येथे संपन्न झाला.यावेळी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष शिवाजी जाधव व जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे यांनी 


तालुक्याचा वार्षिक कार्य अहवाल राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ऍड.आ.जयदेव गायकवाड व जिल्हाध्यक्ष प्रा.धनंजय साठे यांचेकडे सादर करण्यात आला. या जिल्हा स्तरीय चिंतन शिबिराला प्रदेशाध्यक्ष आ. जयदेवराव गायकवाड( राज्य प्रमुख),मा.आ.दिपक आबा साळुंखे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मा.उत्तमराव जानकर,पंडीत कांबळे प्रदेश उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग, मा. धनंजय साठे सर यांनी मार्गदर्शन केले.या मेळाव्यास जिल्हा सरचिटणीस जयसिंग मस्के,अनिल अरणे उपाध्यक्ष,राजू पवार तालुका चिटणीस, सागर ओहोळ करमाळा तालुका कार्यकारीणी सदस्य, ओंकार पलंगे शहराध्यक्ष, गणेश पवार, लक्ष्मण पवार, मनोज पवार, आदी सामाजिक न्याय विभागाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा