Breaking

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

टेंभुर्णी शहरात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र शासनाच्या निषेधार्थ टेंभुर्णी मध्ये कडकडीत बंद*



.*टेंभुर्णी शहरात महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र शासनाच्या निषेधार्थ टेंभुर्णी मध्ये कडकडीत बंद* 


  टेंभुर्णीदि.११ (प्रतिनिधी.) अमोल भोसले यास कडून

AJ 24 Taas News Maharashtra channel

टेंभुर्णी येथे महाविकास आघाडी कडून उत्तप्रदेशातील लखीमपुर  येथे घडलेल्या घटनेचा केंद्र शासनाचा निषेध करण्यासाठी व दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांना  श्रध्दांजली म्हणून महाराष्ट्रा बंद आवाहन करण्यात आले होते .त्या पार्श्वभूमीवर टेंभुर्णी मध्ये बंद चे आवाहन करण्यात आले होते दिनांक ११ ऑक्टोंबर रोजी हा बंद चे आवाहन आले होते . टेंभुर्णी मधील  व्यापाऱ्यांनी बंदला शंभर टक्के  प्रतिसाद दिला  


   महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांची रविवारी बैठक झाली होती त्यामध्ये बंद हा शांततेच्या मार्गाने व मृत पावलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्याची ठरले त्याप्रमाणे आज सकाळी दहा वाजता करमाळा चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निषेध सभा घेण्यात आली त्यामध्ये केंद्र सरकारचा  मृत्युमुखी पडलेल्या शेतकर्‍यांच्या प्रति असंवेदनशील  पणाचा निषेध करण्यात आला.


 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, प्रहार संघटना  स्वाभिमानी शेतकरी संघटना ,या  महाविकासआघाडी मधील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी प्रहारचे दत्ताभाऊ मस्के, मातंग एकता आंदोलनाचे व काँग्रेसचे रामभाऊ वाघमारे शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर  देशमुख शहर प्रमुख सुरेश लोंढे,  सोमनाथ कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे अध्यक्ष संभाजी पाटील किसान सेलचे भजनदास गायकवाड ,रामभाऊ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सचिन होदाडे, माजी उपसभापती तथा जिल्हा परिषदेचे सदस्य प्रतिनिधी तुकाराम उर्फ बंडू नाना ढवळे,  राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष  रमेश पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले व केंद्र शासनाच्या कृतीचा निषेध केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे महेंद्र  वाकसे, संजय कुटे पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वैभव कुटे, सुरेश कुटे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे टेंभुर्णी युवक अध्यक्ष मयूर काळे,संतोष लोंढे,महेश चौधरी,राजेश बागवाले.  शेतकरी संघटनेचे चंद्रकांत कुटे शिवसेना उपशहर प्रमुख प्रशांत सोनवणे, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष हनुमंत चव्हाण ,संजय मिस्कीन तांबे वे तंटामुक्ती अध्यक्ष नागनाथ (भाऊ )खटके, अमोल धुमाळ, विजय (भाऊ) खटके, अशोक खटके, संतोष जगताप इत्यादी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यानंतर महाविकास आघाडी  कडून घटनेच्या निषेधार्थ निवेदन टेंभुर्णी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना देण्यात आले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा