*तामलवाडी येथे महाविकास आघाडीने राष्ट्रीय महामार्ग तासभर रोखला; महाराष्ट्र बंदला उत्तम प्रतिसाद*
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील टोलनाक्यावर तामलवाडीसह सावरगाव, काटी, वडगाव (काटी) पिंपळा, सुरतगाव आदी गावातील महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वतीने लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडलेल्या निषेधार्थ सोमवार दि. 11 रोजी सकाळी 10:30 ते 11:30 च्या दरम्यान जवळपास तासभर राष्ट्रीय महामार्ग रोखून महाराष्ट्र बंदला प्रतिसाद दिला. तामलवाडी परिसरातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना आदी घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी या बंदमध्ये सहभाग नोंदविला होता. सध्या नवरात्र महोत्सव सुरू असून सोलापूरसह विविध ठिकाणांहून भाविक देवी दर्शनासाठी वाहानाद्वारे तसेच पायी चालत येत आहेत.बंद दरम्यान कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत,पोलीस उपनिरीक्षक एस.जी.बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलिसांच्या वतीने यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तामलवाडी पोलीसात व कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ बाचाबाची वगळता बंद शांततेत पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष बसवनप्पा मसुते, तालुका उपाध्यक्ष शिवाजी सावंत,बाजार समितीचे माजी सभापती मलिकार्जुन मसुते, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जगन्नाथ गवळी, अप्पुराजे गवळी, अमोल घोटकर, पांडुरंग लोंढे, कॉंग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य गुंडाप्पा गायकवाड, सरपंच रामेश्वर तोडकरी, सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुजित हंगरगेकर, सयाजीराव देशमुख, दादा बेग, भैरी काळे, रामेश्वर लाडुळकर, बळी चवळे,नंदु जाधव,सुधीर पाटील, कुमार जतकर, बाबा काशिद, देवानंद काळे, राहुल गुंड, सतीश माळी,चन्नाप्पा मसुते, विकास खंडाळकर, शिवदास पाटील, गणेश धोत्रे, विठ्ठल गुंड,नजीब काझी, बबन हेडे, भारत डोके, जुबेर शेख, सुनिल नकाते, सागर पाटील, महंमद मुजावर, मारुती बेटकर, गणेश डोलारे, तम्मा इटकर,शामराव मिश्रा, दत्तात्रय गवळी, बालाजी खराबे, धर्मराज बोबडे, यांच्यासह तामलवाडी पंचक्रोशीतील महाविकास आघाडी घटक पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा