Breaking

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

शेतक-यांना ई पीक पाहणीची सुविधा मोफत-तहसिलदार कुलथे



शेतक-यांना ई पीक पाहणीची सुविधा मोफत-
तहसिलदार कुलथे

श्रीगोंदा-नितीन रोही,

महसुल विभागामार्फत संपूर्ण राज्यात शेतक-यांना ई पीक पाहणीची सुविधा मोफत उपलब्ध करुन दिली असून यासाठी मोबाईल अॅप्लिकेशन ई पीक पाहणी हे गुगल प्लेस्टोअर वर उपलब्ध आहे. हया प्रकल्पाची अंमलबजावणी १५ ऑगस्ट २०२१ पासून सुरु झाली आहे.

शेतक-यांना देय असलेल्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ही माहिती उपयुक्त राहणार आहे. ठिबक/ तुषार सिंचन योजनांचा लाभ खातेधारकांना अचुक देणे शक्य होईल. पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई, अचुकरीत्या व गतीने शक्य होणार आहे. तसेच सदर ई पीक पाहणी अॅप मध्ये १६ ऑक्टोबर पासुन रब्बी पिकाची पिकपाहणी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सोबतच खरीप व संपूर्ण वर्ष या दोन्ही हंगामातील नोंदणी न झालेल्या पिकांची नोंद करता येणार आहे.

अशा प्रकारे नोंदणी केल्यास शेतक-यांचे शेतात पेरणी झालेली आहे. ते वस्तुनिष्ट पणे पिक नोंदवले जाईल. पिक कर्ज व प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळण्यास सुलभ होईल. तसेच एखादया ठराविक पिकास शासनातर्फे अतिवृष्टी, दुष्काळी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्ती मदत / अनुदान जाहीर झाली तर त्याचा लाभ मिळणे सुकर होईल. जंगली जनावरांनी शेतातील पिकांचे नुकसान केले तर त्याचा लाभ मिळणे सोपे होईल.

सदर पिक नोंदणीबाबत किंवा अॅप बाबत कोणतीही अडचण असल्यास आपल्या गावातील तलाठी अथवा कृषी सहाय्यक यांचेशी संपर्क करावा.

तरी तहसिलदार श्रीगोंदा यांनी शेतकरी वर्गाला जाहीर अवाहन केले आहे.श्रीगोंदा तालुक्यातील सर्व शेतक-यांनी ई पिक पाहणी अॅप डाऊनलोड करावे. व ई पिक पाहणी करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा