Breaking

मंगळवार, १९ ऑक्टोबर, २०२१

रिपाइं(ए) च्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी गणेश घुगे तर जिल्हा संपर्क प्रमुख पदी शेखर जगताप यांची निवड.


रिपाइं(ए) च्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी गणेश घुगे तर जिल्हा संपर्क प्रमुख पदी शेखर जगताप यांची निवड.


टेंभुर्णी प्रतिनिधी/अमोल भोसले यास कडून
AJ 24 Taas News Maharashtra

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी कुर्डूवाडी येथील गणेश हनुमंत घुगे यांची निवड करण्यात आली तर सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी टेंभुर्णी येथील शेखर रमेश जगताप यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या आदेशावरून महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा सुनीता ताई चव्हाण यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष शांतीसागर सरवदे,DNB प्रमुख सचिन गजगदाने, सोलापूर शहराध्यक्ष उमेश मस्के शिवाजी घुगे अनिल थोरात विकास पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित. यावेळी बोलताना शेखर जगताप यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले पक्षाचे संघटन वाढवून पक्ष तळागाळातील जनतेपर्यंत पोचविण्याचे काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शेखर जगताप यांच्या निवडीनंतर टेंभुर्णी शहरांमध्ये कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा