सुदृढ बालकासाठी आईचा आहार पोषक हवा - प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे
श्रीगोंदा-नितीन रोही,
--सकारात्मक विचार असणारं मन घडण्यासाठी प्रत्येक आईने जिजामातेचा आदर्श घ्यायला हवा. कारण खंबीर मन असणारी आई सुदृढ बालकास जन्म देते म्हणून आईचाच आहार पोषक व मन निरोगी असावे असे प्रतिपादन तालुका एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विनोद लोंढे यांनी केले.
श्रीगोंदा फॅक्टरी येथील अंगणवाडीत कुपोषित बालकांना व मातांना पोषण आहार मोफत किट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रा.पं सदस्या उषाताई सावंत होत्या.कुपोषित बालकांना जिजाबापू रोडे, महेंद्र मरलेचा, प्रविण राऊत,नरेंद्र मोदी आर्मीचे तालुकाध्यक्ष राहूल भंडारी यांचे देणगीतून हे कीट देण्यात आले.यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक रामदास ठाकर सर, पर्यवेक्षिका मीरा खेतमाळीस, सेविका साधना ओहोळ यांनी पोषण आहार व उत्तम आरोग्य कसे राखावे याबाबत मार्गदर्शन केले .कार्यक्रमास पं.स.सदस्य नानासाहेब ससाणे,सरपंच पती उदयसिंह सूर्यवंशी,उपसरपंच अरविंद कुरुमकर,मानव विकास संशोधन संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र सावंत श्री. रेवगे , निळकंठ जंगले, ग्रामसेवक माने, ,पै.आण्णा गायकवाड, फुलचंद सावंत, सुरेश पवार, संदीप कोकाटे, गणेश कंकटवार, शेखर रंधवे,जयदिप जगताप, अनिस हवलदार, स्वाती शिंदे तसेच परिसरातील अंगणवाडी सेविका, माता, पालक , ग्रामस्थ उपस्थित होते. आभार भालचंद्र सावंत यांनी मानले.
फोटो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा