Breaking

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०२१

टेंभुर्णी परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस विद्युततारेत सॉर्ट सर्किट होऊन जळाल्याने सहा लाख रुपयांचे नुकसान*



*टेंभुर्णी परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस विद्युततारेत सॉर्ट सर्किट होऊन जळाल्याने सहा लाख रुपयांचे नुकसान*




टेंभुर्णी : - टेंभुर्णी परिसरातील अकलूज रोड नजिक एका शेतकऱ्यांचा जीवापाड जपलेला तीन एकर आडसाली ऊस लोंबकळणाऱ्या तारेत सॉर्ट सर्किट होऊन जळाल्याने ठिबक संचासह ५-६ लाखाचे नुकसान झाले असून या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.p


कृष्णा हरी देशमुख (वय-४५) रा.टेंभुर्णी असे ऊस जळून नुकसान झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी आपल्या गट नं-१७७/३ या गटात आडसाली तीन एकर ऊस लागवड केली होती.तसेच पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचन संच बसविला होता.त्यांनी वेळोवेळी खाते,औषध फवारणी करून ऊस पीक जोमदार सांभाळले होते.या ऊस सांभाळण्यासाठी जवळचे पैसे संपल्यानंतर त्यांनी व्याजाने ही काही रक्कम घेतली होती.आता थोड्या दिवसात कारखाने सुरू होतील या आशेवर देशमुख कुटुंब कारखाने सुरू होण्याची वाट पहात होते.मात्र आज मंगळवारी दुपारी दोन वा. सुमारास विजेच्या तारात घर्षण होऊन ठिणग्या पडल्याने अचानक ऊस पेटला.यावेळी जिवाच्या आकांताने शेतकऱ्याने आरडा-ओरड करून लोकांना जमविले पण आग एवढी प्रचंड होती की,क्षणात होत्याचे नव्हते झाले.अन लाखो रुपयाचा ऊस जळून खाक झाला.यामध्ये ठिबक संचासह कृष्णा देशमुख यांचे सहा-सात लाखाचे नुकसान झाले आहे.गट दोन वर्षांपूर्वी ही नाना नांगरे या शेतकऱ्याचे अशाच पद्धतीने तीन-चार एकर ऊस जळून नुकसान झाले होते.

घटनेनंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने पाहणी केली आहे.या कृष्णा देशमुख या शेतकऱ्याने नुकसान भरपाई मिळावी अशी वीज वितरण कंपनीकडे मागणी केली आहे.ठिकठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत असल्याचे चित्र असून यामुळे घटनेने हतबल झालेले शेतकरी आणखी खचून जात आहेत.या ठिकाणी योगेश बोबडे,नागनाथ वाघे,हरिभाऊ सटाले,संतोष वाघे यांनी भेट दिली तर गणेश कुटे,शिवाजी कुटे,विष्णू देशमुख यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा