Breaking

बुधवार, १३ ऑक्टोबर, २०२१

कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी केला हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार..


*कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी केला हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार..


 इंदापूर प्रतिनिधी- आदित्य बोराटे

   कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील व  श्रीमती पदमाताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच बिनविरोध झाली त्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांचा सत्कार  सर्व कामगार बंधूंच्या वतीने जेष्ठ कामगारांच्या शुभहस्ते व कार्यकारी संचालक लोकरे साहेब, सर्व खाते व विभाग प्रमुख यांचे उपस्थितीत संपन्न झाला.
   
      हर्षवर्धन पाटील यांनी कामगारांना गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांना मार्गदर्शन केले व निवडणूक बिनविरोध झाल्या बद्दल सर्वांचे आभार मानले.यावेळी संचालक यशवंत वाघ, राजेंद्र गायकवाड, मच्छिंद्र अभंग इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा