Breaking

सोमवार, २५ ऑक्टोबर, २०२१

भुरकवडीत जनावरांना लाळ खुरकत लसीकरण



भुरकवडीत जनावरांना लाळ खुरकत लसीकरण


वडूज प्रतिनिधी / शरद कदम

          महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय रोग नियत्रंण कार्यक्रम अंतर्गत व खटाव तालुका लघु पशु सर्वाचिकित्सालयाच्या वतीने जिल्हा पशू संवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशू संवर्धन अधिकारी डॉ.संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भुरकवडी ता खटाव येथे २३० जनावरांना लाळ खुरकत लसीकरण करण्यात आले. लसीकरण शिबिराचे उदघाटन सरपंच ललिता कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी पशूधन विकास अधिकारी डॉ.नितीन खाडे, माजी सरपंच शिवाजीराव कदम, एस के कदम सर, सोसायटीचे अध्यक्ष हणमंत कदम, शरद कदम, मधुकर कदम, कैलास जाधव, छगन कदम, संजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
      यावेळी डॉ.खाडे म्हणाले, शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची काळजी आपल्या मुलाप्रमाणे घ्यावी. कमी होत चाललेले पशूधन आपली लक्ष्मी आहे असे समजून शासनाने दिलेल्या विविध सुविद्यांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी व लाळ्या खुरकत लसीकरण करून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. या लसीकरण शिबिरासाठी सहाय्यक पशू संवर्धन आयुक्त डॉ.अशोक मोरे, पशूधन विकास अधिकारी डॉ.निलेश शिंदे, मदतनीस सतिश खाडे, नितेश खाडे यांनी मोलाचे सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा