*लक्ष्मी आनंद विद्यामंदिर मध्ये महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री व भगतसिंग यांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी*
दि:2 ऑक्टोबर (प्रतिनिधी):श्री माऊली शिक्षण प्रसारक मंडळ व समाजसेवा मंडळ संचलित, लक्ष्मी आनंद विद्या मंदिर, टेंभूर्णी (करमाळा रोड) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व विर शहिद भगतसिंग तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती अतिशय आनंदात साजरी करण्यात आली. श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळ नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण वाढीचा विचार करते.विद्यार्थ्यांचा अभ्यास फक्त चार भिंतींच्या क्लास मध्ये होत नाही हे संस्थेने अनेक उपक्रमाच्या माध्यमातून शक्य करून दाखवले आहे.आशा महत्वाच्या व्यक्तींच्या जयंती,पुण्यतिथी च्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या बुद्ध्यांकामध्ये वाढ होईल अशा उपक्रमाचे नियोजन वेळोवेळी संस्था करते.या वर्षी
महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री व भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पाचवी ते दहावी तील विद्यार्थ्यांची प्रशालेत (क्विझ कॉम्पिटीशन) प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली, यामध्ये मुलांचे गट करण्यात आले,सत्यमेव जयते,अहिंसा,शहीद,आझाद व केसरी असे गट करण्यात आले होते.यापैकी अनेक फेऱ्या नंतर शहीद हा गट विजेता ठरला.या प्रश्नमंजुषा मध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री व भगतसिंग यांच्या जीवनचरित्रा वर आधारित प्रश्न विचारण्यात आले.त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या, विद्यार्थ्यांनी खूप छान प्रकारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व भगतसिंग यांच्या विषयी विचार व्यक्त केले. या क्विज कॉम्पिटिशनचे सूत्रसंचालन सागर खुळे व राहुल सरवदे यांनी केले.
इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन उपक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी गांधीजींची व भगतसिंग यांची वेशभूषा करणे, भाषण, चरख्याचे किंवा तिरंग्याचे चित्र काढणे या उपक्रमांत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे चेअरमन श्री योगेश बोबडे सर, सौ. सूरजा बोबडे मॅडम व प्राचार्या कीर्ती मॅडम, उपप्राचार्या शेवतेकर मॅडम यांनी उपस्थित राहून उपक्रमात सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले. अशा प्रकारे महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री व भगतसिंग यांचे विचार, तत्व विद्यार्थी कशाप्रकारे आचरणात आणू शकतात या वरती आधारित जयंती उत्साहात,आनंदात साजरी झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा