श्री गणपती फार्मसीमध्ये गांधी जयंती साजरी
अकोले खुर्द.ता.माढा श्री गणपती फार्मसीमध्ये 2 ऑक्टोबर गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख पाहुणे मधुकर येळवे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे यांनी महात्मा गांधींचे विचार मांडले महात्मा गांधी यांचा जन्मदिवस 2 ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये केला.गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा या तत्त्वांचा पुरस्कार केला रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा गांधी म्हणजेच महान आत्मा ही उपाधी दिली.लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृतपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते महात्मा गांधी यांनी मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन, दांडीयात्रा, अस्पृश्यता निवारण स्वदेशी, खादीचा पुरस्कार, शेतकऱ्यांचे प्रश्न इत्यादी. कामावर भर दिला
सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अॅड विजयराव हिरवे, उपाध्यक्ष बाबा येडगे, प्राचार्या डॉ.रुपाली बेंदगुडे, प्रा.स्वाती पाटील,प्रा.महादेवी भोसले प्रा. मुक्ताई जाधव व इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा