Breaking

सोमवार, ११ ऑक्टोबर, २०२१

तुळजापूर तालुक्यातील गुजनुर येथे तंटामुक्त अध्यक्षपदी राजकुमार पाटील यांची बिनविरोध निवड, त्यानिमित्त महादेव (महाराज) मोरे यांच्या वतीने सत्कार*



*तुळजापूर तालुक्यातील गुजनुर येथे तंटामुक्त अध्यक्षपदी राजकुमार पाटील यांची बिनविरोध निवड, त्यानिमित्त महादेव (महाराज) मोरे यांच्या वतीने सत्कार*

आज दिनांक,११ ऑक्टोबर २०२१, रोजी तुळजापूर तालुक्यातील गूजनुर येथे ग्रामपंचायत कार्यालयात कोरोणा चे सर्व नियम पाळून,सौ सुवर्णा साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली,यामध्ये तंटामुक्त अध्यक्ष पदी श्री राजकुमार पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी जितू माने यांची निवड करण्यात आली, गावातील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत बिनविरोध तंटामुक्त अध्यक्ष निवड करण्यात आली, त्यानिमित्त महादेव महाराज मोरे यांच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पाणीपुरवठा विभाग पंचायत समिती तुळजापूर संपर्क अधिकारी म्हणून उपस्थित होते,तसेच संपर्क अधिकारी बिराजदार साहेब यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सौ, सुवर्णा व्यंकट साळुंके, उपसरपंच सौ,सुनीता सूरज साळुंके,सदस्या सौ,सुमन रमेश मोरे,सौ कमलबाई भागवत पाटील, सदस्य श्री नागनाथ वसंत साळुंखे,श्रीमती सुमनबाई हणमंत वाघमारे, मुख्याध्यापक क्षीरसागर सर,आणि ग्रामपंचायत कर्मचारी श्रीकांत स्वामी, यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा