महाराष्ट्र बंद च्या हाकेला मारतळा येथे बंद पाळण्यात आला
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
उत्तर प्रदेश येथील लखिमपुर येथे शेतकऱ्यांना स्वतःच्या गाडीने चिरडून मृत व जखमी करण्यात आले होते.त्या घटनेतील मुख्य आरोपी आशीष मिश्रा यांच्यावर खटला चालून कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होत असून केंद्र सरकारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शवत बंद ची हाक दिनांक 11/10/2021 रोजी देण्यात आली त्याचे पडसाद मारतळा मध्ये उमटले असून कॉग्रेसचे जिल्हा सचिव भास्कर पाटील जोमेगावकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय पाटील ढेपे आदी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना बंद पाळण्यासाठी व बंद मध्ये सहभागी होण्यासाठी आव्हान केले.व्यापाऱ्यांनी आपले प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला प्रतिसाद दिला.
यावेळी कॉग्रेसचे जिल्हा सचिव भास्कर पाटील जोमेगावकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय पाटील ढेपे तालुका उपाध्यक्ष नागोराव सिरसाट माधव कदम विनायक भरकड बालाजी कपाळे हरी डोंगरे हणमंत पिंपळदरीकर यांच्या सह बंद मध्ये शेतकरी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा