Breaking

शनिवार, २ ऑक्टोबर, २०२१

महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त,जिल्हा स्त्री रुग्णालयात अभिवादन


महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त,
जिल्हा स्त्री रुग्णालयात अभिवादन

 

उस्मानाबाद,दि.2  राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री  यांच्या जयंतीनिमित्त  येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात त्यांच्या प्रतिमांना  पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.                     

या वेळी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक  डॉ. स्मिता गवळी - सरोदे,  डॉ. सोनटक्के, डॉ. पाटील,  परिचारिका श्रीमती देशमुख, श्रीमती भंडारे,  श्रीमती विडेकर  यांची प्रमुख उपस्थिती होती. अभिवादन कार्यक्रमानंतर स्त्री रुग्णालयातील परिसराची वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांनी स्वच्छता केली.

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा