Breaking

गुरुवार, २८ ऑक्टोबर, २०२१

मोडनिंब ग्रामपंचायत च्या विरोधात हलगीनाद आंदोलनाला यश ...दोन महिन्यात रस्ते दुरुस्त करण्याचे सरपंचाचे आश्वासन*



*मोडनिंब ग्रामपंचायत च्या विरोधात हलगीनाद आंदोलनाला यश ...दोन महिन्यात रस्ते दुरुस्त करण्याचे  सरपंचाचे आश्वासन*


*AJ 24Tass News

मोडनिंब प्रतिनिधी/विजय कुमार परबत

 मोडनिंब येथील दत्त नगर भागातील अंतर्गत रस्ते दोन महिन्यात सिमेंट कॉंक्रीटचे करण्यात येतील असे आश्वासन मोडनिंब ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ मीनाताई शिंदे यांनी आंदोलनकर्ते हनुमंत कुंभार व विजयकुमार परबत यांना दिले.
        मोडनिंब येथील दत्त नगर भागातील अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करावेत, तुंबलेल्या गटारी व चेंबरची दुरुस्ती करावी,लिंगायत स्मशानभूमीतील अतिक्रमण काढून सुरक्षा भिंत बांधावी व तेथे पाणी, स्वच्छता, बैठक व्यवस्था करावी मोडनिंब मधील कचऱ्यांचे ढीग आहेत त्याची वेळीच विल्हेवाट लावावी या मागण्यांच्या पूर्ततेसाठी गुरुवार दिनांक २८ आक्टोबर २०२१रोजी सकाळी १० वाजले पासून हनुमंत कुंभार यांचे नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कार्यालय समोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी सरपंच मीनाताई शिंदे यांनी १५ व्या वित्त आयोगातून व जिल्हा परिषद फंडातून दत्तनगर भागातील काही रस्ते सिमेंट काँक्रीटचे केले जाणार असल्याचे लेखी पत्र दिले असून दत्तनगर मधील उर्वरित रस्ते निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे सिमेंट काँक्रीटचे केले जातील, गटारी व चेंबर दुरुस्तीचे काम विनाविलंब केले जाईल, कचऱ्यांचे ढीग उचलण्याचे काम सुरू केले आहे .लिंगायत स्मशानभूमीतील अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासकीय स्तरावरील प्रक्रिया पूर्ण करून कारवाई केली जाईल. असे आश्वासन सरपंच मीनाताई शिंदे यांनी आंदोलनकर्ते हनुमंत कुंभार व विजयकुमार परबत यांना दिले आहे.
       यावेळी दत्तनगर मधील अनेक नागरिकांनी समक्ष भेटून व काहींनी भ्रमणध्वनीवरून पाठिंबा दिला ग्रामपंचायत सदस्य बालाजी भाऊ पाटील, ग्रामपंचायत सदस्य अमर ओहोळ, राष्ट्रवादी ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गिड्डे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी संजीव शिंदे, माजी कृषी अधिकारी एम एस पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराजे सुर्वे, उदयकुमार जाधव, पत्रकार बाळासाहेब ओहोळ,  बलभीम बाबा शेळके, गौतम ओहोळ,बंडू तोडकरी, सिद्धार्थ शेंडगे, राजाभाऊ कानडे, अमोल गुरव ,अमोल काटकर, पोपट जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी अरुण सुर्वे बिभिषण गायकवाड उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त मोडनिंब दूर क्षेत्र कार्यालयाचे हेड कॉन्स्टेबल आसिफ आतार यांनी ठेवला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा