Breaking

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

कोरोना मुक्त' मतदारसंघ होण्यासाठी प्रत्येक गावात 100% लसीकरण मोहीम यशस्वी करावी.... आमदार बबनदादा शिंदे .. अधिकारी व कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेणार..



'कोरोना मुक्त' मतदारसंघ होण्यासाठी प्रत्येक गावात 100% लसीकरण मोहीम यशस्वी करावी.... आमदार बबनदादा शिंदे 
.. अधिकारी व कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेणार..

बेंबळे।प्रतिनिधी।                 

                       माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात 100% कोरोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण व्हावे व यासाठी संमंधीत विभागीय शासकीय अधिकारी ,कर्मचारी व प्रत्येक गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने कोरोना लसीकरण मोहीम यशस्वी करावी . 'गावात शंभर टक्के लसीकरण ही आमची जबाबदारी व पर्यायाने "कोरोना मुक्त विधानसभा मतदारसंघ" ही प्रत्येकाची जबाबदारी' ही अत्यावश्यक बाब यशस्वी करून दाखवावी असे आवाहन आमदार बबनदादा शिंदे यांनी सर्वांना केले आहे.

          अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या माढा तालुक्यातील 82 गावात, पंढरपूर तालुक्यातील 42 गावात, व माळशिरस तालुक्यातील 16 गावात,  100% कोरोना लसीकरण पूर्ण व्हावे व यासाठी तालुक्याचे तहसीलदार ,गटविकास अधिकारी , तालुका आरोग्य प्रमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर्स, नर्सेस, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी, कृषी सहाय्यक व तसेच प्रत्येक गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, कोरोना प्रतीबंधक लसीचे प्रत्येक नागरिकाला दोन्ही डोस मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत  व यासाठी प्रत्येक गावात आरोग्य कमिटी स्थापन करावी व समन्वयाने ही मोहीम यशस्वी करावी.. 

                    अधिक माहिती देताना आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की सध्या सर्वत्र कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे, अनेक ठिकाणी लस परत करण्याची वेळ आली आहे. गावोगावी, वाड्या-वस्त्यावर लसीकरण- कॅम्प च्या माध्यमातून नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. त्याचप्रमाणे 65 वर्षापुढील जेष्ठ नागरिक ,दिव्यांग किंवा अंध व्यक्तीस घरोघर जाउन लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत आहे. तरी देखील  कांही ठिकाणी नागरिक हेतुपुरस्कर , बेजबाबदारपणे किंवा भितीने लसीकरण टाळत आहेत तर बऱ्याच ठिकाणी महिला व जेष्ठ नागरिक किंवा प्रौढ नागरिक देखील  लसीकरणाला घाबरून लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत व ही बाब योग्य नाही कारण  लसीकरणाचे दोन्ही डोस घेणे म्हणजे प्रत्येक मानव जातीसाठी "कवच-कुंडले" ठरलेली आहेत ,.यासाठी प्रत्येक गाव शंभर टक्के लसीकरण होउन कोरोना मुक्त होणे व पर्यायाने विधानसभा मतदारसंघ कोरोना मुक्त होणे ही मानव जातीच्या सुरक्षिततेसाठी काळाची नितांत गरज निर्माण झालेली आहे  हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.


चौकट..........

 ................।।सर्वांची बैठक घेणार।।..........

              आमदार बबनदादा शिंदे म्हणाले की माढा विधानसभा मतदारसंघातील  माढा ,पंढरपूर व माळशिरस तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका प्रमुख आरोग्य अधिकारी, प्राथमिक केंद्राचे डॉक्टर्स, नर्सेस, आया ,आशा वर्कर्स, आरोग्य सहाय्यक, अंगणवाडी सेविका, शिक्षक, तलाठी, मंडल अधिकारी, कृषी सहाय्यक , कृषी पर्यवेक्षक व सर्वपक्षीय कार्यकर्ते या सर्वांची  लवकरच मी बैठक घेणार आहे. जेणेकरून मतदारसंघातील माढा तालुक्यातील 82 गावे, पंढरपूर मधील 42 गावे व माळशिरस मधील चौदा गावे पूर्णपणे 100%  लसीकरण होतील व पर्यायाने माढा विधानसभा मतदारसंघ संपूर्ण कोरोना मुक्त मतदारसंघ म्हणून गणला जाईल .

                        आमदार बबनदादा शिंदे
                           विधानसभा सदस्य 
                      माढा- पंढरपूर व माळशिरस.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा