Breaking

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

कुर्डूवाडी शहराचा भारताच्या पश्‍चिम विभागामध्ये 35 वा क्रमांक तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 रा क्रमांक*



*कुर्डूवाडी शहराचा भारताच्या पश्‍चिम विभागामध्ये 35 वा क्रमांक तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 रा क्रमांक*


भारत सरकारचे नगर विकास विभागाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये 25000 लोकसंख्येच्या गटात कुर्डूवाडी शहर 2018 पासून सहभाग घेत आहे. 2018 साली 143वा,  2019 मध्ये 123वा, 2020मध्ये 37वा तर 2021 मध्ये 35 वा क्रमांक आला आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये 2 रा क्रमांक पटकावला आहे. 



कुर्डुवाडी शहर 2015 साली हागणदारीमुक्त घोषित करण्यात आले व सन 2018  ते सन 2020 या कालावधीत ODF+ चा बहुमान मिळवला व कुर्डुवाडी शहराने सन 2021 मध्ये ODF++  चा बहुमान पटकावला. पुढील सर्वेक्षणामध्ये शहराची स्थिती सुधार करून उत्तम कामगिरी करण्याचा निर्धार मुख्याधिकारी समीर भुमकरसाहेब यांनी केला.
सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, नगराध्यक्ष समीर मुलाणी, उपनगराध्यक्षा उर्मिला हरीभाऊ बागल, आरोग्य सभापती राधिका मनोज धायगुडे, व सर्व नगरसेवक यांचे सहकार्य लाभले व त्यांनी नगरपालिका कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
सदर सर्वेक्षण मध्ये कार्यालयीन अधिक्षक अतुल शिंदे, आरोग्य निरीक्षक तुकाराम  पायगण, नोडल अधिकारी कोमल वावरे, शहर समन्वयक अभिजित पवार, फय्याज शेख, मुकादम सुरेश कदम, शिवाजी खवळे,ब्रिजपाल वाल्मीकि, व स्वच्छता दूत सागर बागल,अविनाश गोडगे,आकाश गोडगे,अक्षय तोमर,दत्ता गायकवाड,विक्रम बागल,संदीप ढावरे, व सर्व सफाई कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा