Breaking

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

*सौ,अर्चनाताई अंबुरे यांची उस्मानाबाद भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती*



*सौ,अर्चनाताई अंबुरे यांची उस्मानाबाद भाजपाच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती*


 उस्मानाबाद भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या अर्चनाताई अंबुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र आज भाजपा पक्षाचे कार्यालय 'स्मृती भवन'या ठिकाणी देण्यात आले.


त्यांच्या निवडीच्या पत्रात भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर व तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली असल्याचे म्हटले आहे.

अर्चनाताई अंबुरे यांनी बचत गट व उद्योगाच्या माध्यमातून अनेक महिलांच्या संपर्कात असून त्यांनी महिलांचे जाळे उभे केले आहे. तसेच त्यांनी यापूर्वी जिजाऊ ब्रिगेडच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे.काही दिवसांपूर्वी त्यांनी आ.राणाजगजितसिंह पाटील व आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या  यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळी त्यांची महिला जिल्हाध्यक्ष म्हणून निवड होणार हे निश्चित होते. त्यांच्या निवडीमुळे भारतीय जनता पार्टीला एक सक्रिय महिला जिल्हाध्यक्षा मिळाल्या आहेत.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा