*सुळेवाडी येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते 75 लाख रुपये मंजूरकामाचे भुमीपुजन व उदघाटन*
पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते75 लाख रुपये मंजूर कामाचे भुमीपुजन व उदघाटन करण्यात आले. यावेळी आ रणजीत सिह मोहिते पाटील, आ गोपीचंद पडळकर, आ रामभाऊ सातपुते, भाजपचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, सभापती शोभा साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिह मोहिते पाटील, माजी क्रुषी व पशुसंवर्धन सभापती संग्रामसिंह जहागीरदार, जि प सदस्य गणेश पाटील, जि प सदस्या सुनंदा फुले,राहुल वाघमोडे, पं स सदस्या ताई महाडिक, सदगुरु साखर कारखान्याचे व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर - पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे संचालक विजय पवार, शिवाम्त दुध संघाचे संचालक दादासाहेब शिंगाडे, दत्तात्रय आवताडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आमदार फंडातुन सभामंडप, हायमास्ट दिवे,पंढरपूर रस्त्यापासून सुळेवाडी कडे जाणारा रस्ता ,सतोषा मंदिर पेव्हर ब्लाँक बसविणे, ग्रामपंचायत जवळ आर ओ पँलनट बसविणे,सि सिटीव्ही कँमेरे बसविणे, शाळा खोल्या दुरूस्ती करणे,स्मशानभूमी पेव्हर ब्लाँक बसविणे, स्मशानभूमी वाँल कंपाऊंड, अपंग कल्याण निधी पिक अप शेड उभारणे,पंढरपूर सातारा रस्ता ते इरकरवस्ती रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे,कारखेल रस्ता पुल,गारवाड रस्ता पुल,दलीत वस्ती सुधार योजनेतुन गटार व हायमास्ट दिवा,पंधराव्या वित्त आयोगातुन पाणीपुरवठा व पाईपलाईन मानेवस्ती ते एस टी स्टँड, जि प शाळा वाँल कंपाउंड, अंगणवाडी शौचालय दुरुस्ती, इरकरवस्ती शाळा वाँल कंपाऊंड, या कामांचे भुमीपुजन व उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच बापु करडे, उपसरपंच भिमराव फूले, माजी सरपंच क्रुष्णा सुळे, दुर्योधन सोलंकर,डॉ दत्तुराम लोखंडे, गिरीजाताई दडस,रुक्मिणी झिंबल, जयसिंग सुळे,प्रदीप सुळे,अनिल सोलंकर, रंजना सोलंकर, जयश्री माने,श्रीकांत सुळे,क्रुष्णा इश्वर सुळे, लक्ष्मण सुळे, हरिदास सुळे,संतोष दडस,किसन दडस,नामदेव सोलंकर, अपा लेंगरे, दुर्योधन बिडे,नारायण हुबाले,मल्हारी सुळे, पिलीवचे सरपंच नितीन मोहिते, चंद्रकांत जाधव,सरपंच संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील, कोळेगाव चे सरपंच धनंजय दुपडे, झिंजेवस्तीचे सरपंच राहुल जावळे, कुसमोडचे सरपंच तुषार लवटे, बांधकाम विभागाचे मुलाणी रावसाहेब, ग्रामसेवक मुंगुसकर, उपस्थिती त होते प्रास्ताविक विजय सुळे यांनी तर सुत्रसंचालन विठ्ठल सुळे यांनी केले तर उपस्थिती थांचे सरपंच बापु करडे यांनी आभार मानले. फोटो - सुळेवाडी येथे विकासकामांचे उदघाटन व भुमीपुजन करताना आ रणजितसिंह मोहिते पाटील, आ गोपीचंद पडळकर, आ रामभाऊ सातपुते, धैर्यशील मोहिते पाटील, संग्रामसिंह जहागीरदार, जि प सदस्य गणेश पाटील व मान्यवर .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा