Breaking

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

निशांत प्रविण शिंदे याचे नीट परीक्षेत सुयश*



*निशांत प्रविण शिंदे याचे नीट परीक्षेत सुयश*




*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*


      जातेगाव ता करमाळा येथील प्राथमिक शिक्षक प्रवीण शिंदे याने  नीट परीक्षेत 661 गुण मिळवत उज्वल यश संपादन केले.
      
   यावर्षी गुणांची टक्केवारी वाढलेली दिसली. दोन वर्षांचा लॉक डाउन असताना आणि अभ्यासाची आबाळ झालेली असताना  विद्यार्थी आपली गुणवत्ता टिकून असल्याचे स्पष्ट दिसून आले. जातेगांव ता. करमाळा जिल्हा सोलापूर येथील निशांत प्रविण शिंदे याने तब्बल 661 गुण मिळवले असून तो देशात 2530 वा नंबर आहे. विशेष म्हणजे निशांतचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जातेगाव ता. करमाळा जिल्हा सोलापूर येथे झालेले आहे. महात्मा गांधी हायस्कूल व उच्च माध्यमिक हायस्कूल करमाळा येथून बारावी उत्तीर्ण झालेला निशांत घरी राहून आपली गुणवत्ता सिद्ध शकला आहे. आई स्मिता नवथर-शिंदे या गृहिणी असून वडील जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रविण शिंदे प्राथमिक शिक्षक आहेत. विशेष म्हणजे निशांतची मोठी बहीण स्वराली ही सोलापूरच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात बिडीएस करत आहे.
निशांत ने लातूरच्या प्रतिष्ठीत IIB, RCC व आॅनलाईन Unacademy क्लासमधून शिक्षण घेतले होते. 
निशांतच्या या यशाबद्दल त्याचे करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष दिपक शिंदे, सचीन शिंदे अनेक मान्यवर शिक्षकांनी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा