Breaking

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

राजुरी ग्रामपंचायत कडून लवकरच सर्वरोग निदान शिबीर- डॉ अमोल दुरंदे*



*राजुरी ग्रामपंचायत कडून लवकरच सर्वरोग निदान शिबीर- डॉ अमोल दुरंदे*



*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

      राजुरी ता. करमाळा येथे   बुधराणी हॉस्पिटल व राजुरी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दि.02/11/21 रोजी सकाळी 10वाजता राजुरी ग्रामपंचायत कार्यालयात  नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले .
     यावेळी बोलताना सरपंच डॉ अमोल दुरंदे म्हणाले की राजुरी परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी लवकरच सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये मोतीबिंदू,काचबिंदू,तिरळेपणा अशा अनेक डोळ्यांच्या समस्या वर मोफत उपचार होणार आहेत. एकूण  60 जणांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये 12पेशंट मोतीबिंदू णे निदान झाले त्यांचे मोफत ऑपरेशन दिवाळीनंतर करण्यात येईल.                                  आजच्या शिबिराचे उदघाट्न प्रगतशील बागायतदार लालासाहेब भोईटे  यांनी केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच डॉ. अमोल दुरंदे, ग्रामसेवक रामेश्वर गलांडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, नंदकुमार जगताप,संजय साखरे,अजय साखरे, संभाजी जाधव,श्रीकांत साखरे, लक्ष्मण टापरे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा