Breaking

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०२१

माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षावकुर्डुवाडीच्या उम्मीद संस्थेतील अनाथ मुलांना केले फळांचे वाटप



माढेश्वरी बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव


कुर्डुवाडीच्या उम्मीद संस्थेतील अनाथ मुलांना केले फळांचे वाटप


माढा / प्रतिनिधी - माढा येथील माढेश्वरी अर्बन बँकेचे कर्तव्यदक्ष उपाध्यक्ष तथा साई सेल्स कॉर्पोरेशनचे सर्वेसर्वा अशोकशेठ दगडूलाल लुणावत यांच्या 1 नोव्हेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर दुरध्वनी,फेसबुक व्हॉट्सऍप व इतर संदेशांद्वारे अक्षरशः शुभेच्छांचा वर्षाव झाला असून वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी कुर्डूवाडी येथील उम्मीद संस्थेतील अनाथ मुलांना फळांचे वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

माढेश्वरी अर्बन बँकेचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचा विस्तार आणि नेत्रदिपक प्रगती करण्यासाठी व्हा.चेअरमन अशोक लुणावत यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.माढा शहर व परिसरात साई सेल्स कॉर्पोरेशनचा एक नवा ब्रँड तयार करून उद्योग व व्यवसायाच्या क्षेत्रात गरुड भरारी घेतली आहे त्यामुळे त्यांच्या सामाजिक,शैक्षणिक,कृषी, बँकिंग,वैद्यकीय,सांस्कृतिक, पत्रकारिता,औद्योगिक,राजकीय आदी क्षेत्रांतील असंख्य चाहते,हितचिंतक, मित्रमंडळी व दारफळ सीनाचे ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सदस्य,इतर स्थानिक संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत यथोचित सत्कार केले.सकाळी सर्वप्रथम त्यांच्या सुविद्य पत्नी तथा माढेश्वरी अर्बन बँकेच्या संचालिका मंगल लुणावत यांनी अशोक लुणावत यांना औक्षण करून दीर्घायुष्य लाभावे म्हणून ईश्वर चरणी प्रार्थना केली.यावेळी इंजिनिअर मुलगा अभिजीत व स्नुषा विपुला लुणावत उपस्थित होत्या.

बँकेचे कर्तव्यदक्ष व्हा.चेअरमन अशोकशेठ लुणावत यांचा वाढदिवसानिमित्त माढेश्वरी बँकेच्या विविध शाखांच्या वतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुळे व इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिवसभर त्यांच्या माढा येथील कार्यालयात सत्कार करुन शुभेच्छा देण्यासाठी वर्दळ होती.सायंकाळी कुर्डूवाडी येथे तोफांची सलामी देत फटाके फोडून केक कापून त्यांचा वाढदिवस मित्रमंडळी व बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या दिमाखात साजरा केला.कुर्डुवाडी येथील चिंकहील टेकडी येथे महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर त्याठिकाणी शिवचरणानंद सरस्वती महाराज यांनी अशोक लुणावत यांचा विशेष सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

कुर्डुवाडी येथील डॉ.विनायक वागळे मेमोरियल ट्रस्ट संचालित,उम्मीद संस्थेतील अनाथ मुलांना बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत यांनी सफरचंद व केळीचे वाटप केले. यावेळी प्रमिलाबेन जाधव,माढेश्वरी बँकेचे संचालक गणेश काशीद,वरिष्ठ अधिकारी निलेश कुलकर्णी, शाखाधिकारी लक्ष्मण शिंदे,नूरमहमंद शेख,राहुल शेटे,अभिजीत लुणावत, मुख्याध्यापक सुरेश शिंदे,आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,विनायक दिक्षित, वैभव शेटे,हरिदास कौलगे,नागरबाई बनसोडे,रुपेश गोरटेल यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी- माढेश्वरी अर्बन बँकेचे उपाध्यक्ष अशोकशेठ लुणावत यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करतानाचे फोटो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा