*एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य,ॲड अनिल काळे यांचा जाहिर पाठिंबा*
महाराष्ट्रामधे गेल्या 10 दिवसापासून चालू असलेल्या आंदोलना मधे तुळजापूर आागरतील एस टी कर्मचारी सहभागी आहेत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य adv अनिल काळे यांनी भेट दिली यावेळी आंदोलन कर्त्याशी सविस्तर चर्चा करुण भाजपचे महाराष्ट्राचे अध्य्क्ष मा आ चंद्रकांत दादा पाटिल व् विरोधी पक्ष नेते मा आ देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यन्त आपल्या मागण्या पोहचविणार असल्याचे यावेळी श्री अनिल काळे यांनी सांगितले तसेच गेल्या 60 ते 70 वर्षापासून लाल परी ही महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेची आर्थिक घड़ी बसवनरी वाहिका असून कर्मचारी नौकरी लागल्यापासून रिटायर होईपर्यंत तो कर्मचारी व् त्याचे कुटुम्ब आर्थिक विवेन्चनेत असतो ही खुप खेदाची बाब असून या आन्दोलनाकडे सरकारने सकारात्मक दृष्ट्या नाही पाहिले तर आंदोलन अधिक तीव्र होईल याची जबाबदारी आघाडी शासनाची असेल तसेच आतापर्यंत जवळपास 38 ते 40 st कर्मचारी यांनी आत्महत्या केलि याच पातक अघाड़ी शासनावर असून तुळजापूर आगारातील 18 कर्मचारी यांना निलंबित केले याचा त्यांनी निषेद करुण सर्व कर्मचारयाच्या पाठीशी आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते खंभीर पणे उभे आहोत हे अस्वासन adv अनिल काळे यांनी दिले या आंदोलनाला तालुक्याचे आ राणा दादा यांनीही भेट देऊन मुंबई येथील आंदोलनाला भेट देऊन जाहिर पाठिंबा दिलेला आहे असे ही सांगितले यावेळी एसटी चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा