संभाजी ब्रिगेडच्या महामेळाव्यास हजारो कार्यकर्ते जाणार
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
नांदेड: संभाजी ब्रिगेडच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त मुंबई येथे मंगळवार दि.३० नोव्हेंबर रोजी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.या मेळाव्यात अनेक वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून संभाजी ब्रिगेड सामाजिक कार्यासह राजकीय क्षेत्रातही पाऊल टाकत आहे.शेतकरी, विद्यार्थी, कामगार,महिला यांच्या विविध विषयांवर संभाजी ब्रिगेड आक्रमक पणे शासनाला आंदोलनाच्या माध्यमातून धारेवर धरत असते.अनेक ठिकाणच्या ग्रामपंचायती संभाजी ब्रिगेड च्या ताब्यात आहेत.
मुंबई येथे रंगशारदा सभागृहात हा वर्धापनदिन सोहळा संपन्न होणार असुन या महामेळाव्यात संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष ॲड.मनोज आखरे,महासचिव सौरभ खेडेकर, प्रवक्ते प्रा.गंगाधर बनबरे,प्रा.शिवानंद भानुसे, डॉ.बालाजी जाधव,प्रा.सुदर्शन तारख आदिंचे मार्गदर्शन लाभणार आहे.या मेळाव्यात संभाजी ब्रिगेड ची पुढील राजकीय रणनीती ठरणार आहे.
सदर मुंबई येथील महामेळाव्यास नांदेड जिल्ह्यातुन हजारो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील सोमुरकर, जिल्हाध्यक्ष शाम पाटील कुशावाडीकर, भगवान कदम देगावकर, सुभाष कोल्हे हरसदकर यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा