Breaking

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या केमिस्टच्या नातेवाईकांना तीन लाखांची मदत ...मॅन काइंड कंपनीचा उपक्रम*



*कोरोनामुळे मृत्यू झालेल्या केमिस्टच्या नातेवाईकांना तीन लाखांची मदत ...मॅन काइंड कंपनीचा उपक्रम*



 कोरणा काळात सेवा देत असताना कोरोना ने  निधन झालेल्या केमिस्ट बांधवांच्या कुटुंबियांना मॅन काइंड फार्मा कंपनी तर्फे तीन लाख रुपयांची मदत देण्यात आली शहरातील औषधी भवन येथे आयोजित कार्यक्रमात मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला ..
         कोरोनाच्या  काळात लॉक डाऊन असताना केमिस्ट ग्राहकांना औषध पुरवठा सुरू ठेवत सेवा देत होते .या महामारीत समोर येणारा रुग्ण कोणत्या आजाराचा आहे याची खात्री नसताना स्वतःची पर्वा न करता केमिस्ट्ने गेली दीड वर्षे अखंड औषध पुरवठा केला आहे .ही सेवा देत असताना काही केमिस्ट ना कोरोना ची  लागण होऊन आपले प्राण गमवावा लागला .याची दखल घेऊन मॅनकाईन्ड कंपनीने भारतात कोरोना  काळात विविध क्षेत्रात सेवा देत असताना मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुमारे १५० कोटी रुपये आजपर्यंत मदत म्हणून दिले आहेत .
          कोरोना ने निधन झालेले सुधाकर आगाशे , प्रथमेश मेडिकल बेंबळी, ता जि उस्मानाबाद यांच्या कुटुंबियांना यावेळी मदतीचा धनादेश देण्यात आला .
       यावेळी मॅन काइंड फार्मा चे रिजनल मॅनेजर प्रदीप कदम त्यांचे सहकारी पुरूषोत्तम येवले शाम गुरव, अविनाश साबळे ,सुजित सगरे, ओमकार चव्हाण ,किशोर सुर्वे व योगेश भरड उपस्थित होते .तसेच अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने उस्मानाबाद जिल्हा संघटनेचे अध्यक्ष धनाजी आनंदे, कोषाध्यक्ष कुणाल गांधी ,उस्मानाबाद तालुकाध्यक्ष रोहित फिसरेकर,मार्गदर्शक दिनेश वाबळे, लक्ष्मण मुंडे ,राहूल जाधव ,सर्फराज पटेल ,पोपट शिंदे ,विशाल हिंगमिरे व केमिस्ट बांधव उपस्थित होते .केमिस्ट बांधवांनी या मदती बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा