Breaking

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

युवकांनी उद्योगधंदयातून प्रगती साधावी - संदिप मांडवे


युवकांनी उद्योगधंदयातून प्रगती साधावी - संदिप मांडवे 


वडूज प्रतिनिधी - शरद कदम 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आपआपल्या आवडीनुसार उद्योग व्यवसायातून आपली प्रगती करून समाजकार्यात सहभागी व्हावे असे मत खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदिपदादा मांडवे यांनी केले.
         सातेवाडी ता. खटाव येथील कोरोना योध्दा युवा उद्योजक अक्षय कोळेकर यांच्या वाढदिवसाच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सातारा जिल्हा बँकेचे मा. संचालक प्रा.अर्जुनराव खाडे, निवृत्त शिक्षक रामचंद्र खाडे गुरुजी, शरदराव कदम, अनिल वसव, धनाजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
         श्री.मांडवे पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात सातेवाडी कॉर्नर येथील मधुमाला सांस्कृतिक भवनचे मालक, माजी सरपंच हणमंत कोळेकर व त्यांचे सुपुत्र अक्षय कोळेकर यांनी आपल्या समाजकार्याच्या हेतूने आपले मंगल कार्यालय विना मोबादला दोन महिने कोविड सेंटरला वापरासाठी देऊन रूग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी स्वच्छ पाणीपुरवठा व्यवस्थापन व इतरही सोयीसुविद्याच्या माध्यमातून मोलाचे सहकार्य केल्याबद्दल कोरोना योध्दा म्हणून अक्षय कोळेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा.अर्जूनराव खाडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
        कार्यक्रमास अमोल जाधव, ऋतुराज राऊत, प्रविण गोडसे, संजीव पवार, ललंन पवार, अभिजित चोरमले, अक्षय कोळी आदि सह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद कदम यांनी केले तर आभार तुकाराम खाडे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा