Breaking

सोमवार, २९ नोव्हेंबर, २०२१

फलटण शहराला होत असलेल्या दूषित व घाण पाणी पुरवठा संदर्भात एक डिसेंबरला नगरपालिका मोर्चा काडून मुख्याधिकार्‍यांना दूषित पाणी भेट देणार.-अमीरभाई शेख


फलटण शहराला होत असलेल्या दूषित व घाण पाणी पुरवठा संदर्भात एक डिसेंबरला नगरपालिका मोर्चा काडून मुख्याधिकार्‍यांना दूषित पाणी भेट देणार.-अमीरभाई शेख


 फलटण : फलटण शहराला गेल्या अनेक महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत असून घाण व दूषित पाणी पिल्याने अनेकांना आजार बळावत चालले असून नगरपालिका लक्ष देत नसल्याने दिनांक 1 डिसेंबर रोजी नगरपालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिकार्‍यांना दूषित पाणी भेट देणार असल्याचा इशारा राष्टीय काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमीरभाई शेख यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.    शहरातील सर्वच प्रभाग मध्ये गेल्या तीन महिन्यांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. अनेकदा तोंडी,लेखी निवेदन देवून ही पाणी पुरवठा विभाग व मुख्याधिकारी दुर्लक्ष करत आहेत.त्यामुळे नागरिकांना कावीळ,जुलाब या सारखे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. पाणी पुरवठा शुद्धीकरण साठी लाखो रुपयांचा खर्च करून  प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे.या प्रशासनाच्या   कारभाराला कंटाळून जनतेला सोबत घेत नगर पालिकेवर मोर्चा काढण्यात येणार असून मुख्याधिकारी यांना दूषित पाणी भेट देणार आहे. शहरातील नागरिकांनी दिनांक १/१२/२०२१ रोजी ठीक सकाळी ११.वाजता नगर परिषदेच्या आवारात उपस्थित रहावे असे आवाहन अमीरभाई शेख यांनी फलटण वासियांना केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा