किनवट नगरपरिषद सभापती निवडी करिता आयोजित विशेष सभा नाट्यमयतरित्या कोरम अभावी बारगळली
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट दि:२४- सभापती निवडी करिता आयोजित किनवट नगर परिषदेतील विशेष सभा नाट्यमयरित्या कोरम अभावी बारगळल्याने सभापती पदावर डोळा ठेऊन बाशिंग बांधुन बसलेल्या सदस्यांचा हिरमोड झाला आहे.
मागील ३ वर्षापासुन प्रलंबित असलेल्या किनवट नगर परिषदेतील विषय समितीच्या सभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम आल्या पासुन नगर परिषदेत वर्दळ वाढली होती त्या अनुषंगाने प्रशासनाकडुन २४ नोव्हेंबर चे दिवस निच्चीत करण्यात आले व निवडीचा कार्यक्रम हि जाहीर करण्यात आला. मात्र भारतीय जनता पक्षाच्या गोटा मध्ये एक वाक्यता न झाल्याने आज ची नियोजित सभा हि बारगळी असलेल्या सर्वत्र चर्चिले जात आहे. तर नियोजित विशेष सभे करिता उपस्थिती घेण्यात आली त्यामध्ये नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, उपनगराध्यक्ष व्यंकट नेम्मानिवार, माजी नगराध्यक्ष साजिद खान, इमरान खान यांनी स्वाक्षरी करुन आपली उपस्थिती दर्शवली परंतु यामुळे कोरम पुर्ण न झाल्याने पिठासीन अधिकारी व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी विशेष सभा तहकुब केली.
परंतु राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे गटनेते झहिरोद्दीन खान यांनी पिठासिन अधिका-यांना सभे पुर्वी लिहलेल्या पत्रामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत असुन त्या पत्रानुसार नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी सर्व भाजपा समर्थक सदस्यांची खाजगी बैठक आयोजित करुन त्यात अशी विनंती केली कि, आ. भिमराव केराम यांचे आरोग्य बरोबर नसल्यामुळे ते दवाखाण्यात दाखल आहेत. तरी त्यांच्या अनुपस्थितीत हि विशेष सभा घेणे योग्य नसुन ती तहकुब करण्याकरिता विनंती केल्याचे राष्ट्रवादी क़ॉग्रेसचे गटनेते झहिरोद्दीन खान यांनी पत्र लिहले आहे. तर या पत्रावर माजी नगराध्यक्ष साजिद खान, नगरसेविका नसरीन बानो, शहेर बानो निसार खान, राहत तब्बसुम, नगरसेवक कैलास भगत, इमरान खान यांच्या स्वाक्ष-या आहेत.
भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक शिवा आंधळे यांनी यावेळी बोलतांना सागितले कि सत्ताधारी पक्षाच्या म्हणण्यानुसार चालणा-या विरोधी पक्षातील कळीच्या नारदा मुळे आजची सभा तहकुब झाली यामुळे आमच्या सारख्या मागासवर्गीय सदस्याला जी काम करण्याची संधी मिळणार होती त्यास आम्ही मुकणार आहोत. एकमेकाला घेऊन चालणारे सत्ताधारी व विरोधक हे आज जरी आ. केराम यांच्या तब्येतीचे कारण पुढे करत असले तरी त्याचे मुळ कारण हे वेगळे आहे या विरुद्ध पक्षश्रेष्टीकडे तक्रार करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
आजच्या या सभे दरम्यान सत्ताधारी व विरोधी पक्षातील अनेक सदस्य अनुपस्थित असल्याने या बाबत सदस्यांनी वरिष्ठांकडे विचारणा केली असता खा. प्रतापपाटील चिखलीकर यांनी दुरध्वनीवरुन सुचना दिल्याने सदस्य अनुपस्थित असल्याचे सांगण्यात आले तर खा. चिखलीकर यांचा आदेश भाजपा च्या सदस्यांना लागु होतो परंतु विरोधी पक्षातील राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसचे सदस्य यावेळी का अनुपस्थित होते हा यक्ष प्रश्न उपस्थित होत असुन यासर्व बाबीचा उलगडा आगामी काळात होणार असल्याचे एकंदरीत परिस्थिती वरुन निदर्शनास येत आहे.
तर आजच्या विशेष सभेकरिता पिठासिन अधिकारी म्हणुन सहाय्याक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार (भा.प्र.से) यांनी काम पाहिले तर त्यांना प्रभारी मुख्याधिकारी तथा तहसिलदार डॉ मृणाल जाधव, कार्यालयीन अधिक्षक चंद्रकांत दुधारे सहाय्य केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा