Breaking

बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१

तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे खाद्यतेलाचा टँकर पलटी होऊन, हजारो लिटर खाद्यतेल वाया*



*तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे खाद्यतेलाचा टँकर पलटी होऊन, हजारो लिटर खाद्यतेल वाया*



तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांक ५२, वर दी,२४ नोव्हेंबर २०२१,रोजी सकाळी ७ वाजाच्या सुमारास सांगवी मार्डी येथे खाद्यतेलाचा टँकर आला असता, खाद्यतेलाचे टँकर पलटी होऊन खाद्यतेल संपूर्ण रोडवरती पसरले आहे,या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही, खाद्यतेलाचा टँकर क्रमांक, GJ,३६,T.५९४४. खाद्यतेलाचे टँकर सोलापूरच्या दिशेने जात असताना सांगवी मार्डी नजिक आला असता  ऊसाने भरलेला ट्रॅक्टरला कट मारल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे,घटनास्थळी तुळजापुर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक, चेंनशेट्टी, बीट अंमलदार राठोड, IRB, चे कर्मचारी व तुळजापूर नगरपरिषदेचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले होते,तीन तास संपूर्ण रोड जाम झाला होता. वाहतूक लवकरात लवकर सुरळीत करण्याचा पोलिस प्रशासन व आयआरबीचे कर्मचारी हे प्रयत्न करत आहेत,


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा