*कुसमोड येथील साई समर्थ दुध डेअरीतफँ सभासदांना दिपावली निमित्त बोनसचे वाटप*
पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील साई समर्थ दुध डेअरीतफँ दरवर्षी प्रमाणे यंदाही दिपावली निमीत्त एक रुपया पंचवीस पैसे प्रती लिटर याप्रमाणे सभासदांना बोनसचे वाटप करण्यात आले. प्रथम तिन सभासदांना बोनस त्याचबरोबर आर्कषक बक्षिस देण्यात आले. यावर्षी बापुराव केशव लेंगरे या सभासदाने प्रथम क्रमांक पटकावला त्यांना 47हजार 302 रुपये तसेच मिक्सर भेट म्हणून देण्यात आला, दुसरा क्रमांक संतोष महादेव वाघ त्यांना 17,123 रुपये व इनव्हँरटर,तिसरा क्रमांक गणेश लेंगरे 16,897 व फँन भेट म्हणून देण्यात आला. सदर बोनस वाटप कार्यक्रम प्रसंगी कुसमोडचे सरपंच तुषार लवटे, उपसरपंच लक्ष्मण पवार ,माजी उपसरपंच व पत्रकार संजय पाटील, ग्रा पं सदस्य महावीर धायगुडे, बाळकृष्ण धायगुडे, बापूराव वाघ ,माजी उपसरपंच रणजित पाटील ,धनाजी वाघ,मनोहर लवटे ,पत्रकार दामोदर लोखंडे, शाहरूख मुलाणी ,प्रमोद भैस ,आनंता लेंगरे, शहाजी लेंगरे ,देवानंद धायगुडे ,नबाजी मदने ,अशोक लेंगरे, अंकुश लेगरे, अमर लवटे ,यांच्या सह सर्व सभासद मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे यांनी उपस्थित सभासद बांधवांना मार्गदर्शन केले .तसेच पत्रकार दामोदर लोखंडे यांनी ही उपस्थित सभासदांना यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अनिल लवटे यांनी केले तर आभार मिलिंद लवटे यांनी मानले. फोटो - कुसमोड येथील साई समर्थ दुध डेअरीतफँ सभासदांना बोनस वाटप प्रसंगी सरपंच तुषार लवटे ,पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पत्रकार दामोदर लोखंडे, माजी उपसरपंच संजय पाटील, मनोहर लवटे व मान्यवर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा