Breaking

गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

शुभम कांबळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात १२१ नागरिकांनी घेतली लस..



*शुभम कांबळे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात १२१ नागरिकांनी घेतली लस..


इंदापूर प्रतिनिधी - आदित्य बोराटे

           युवानेते शुभम कांबळे मित्र परिवाराच्या वतीने मंगळवार दि.१६ नोव्हेंबर रोजी खडकपुरा येथे हनुमान मंदिरात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या लसीकरण शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, सभापती प्रवीण माने,मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे,नगरसेवक अमर गाडे,अनिकेत वाघ,अतुल शेटे-पाटील,गजानन गवळी,आदी प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

  इंदापूर उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात १२१ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करूनच लस टोचवण्यात आली अशी माहिती आयोजकांनी दिली.
       
       या लसीकरण शिबिरामध्ये कांबळे बंधू कावड सोहळा व छत्रपती शिवाजी मित्र मंडळ खडकपुरा यांचे योगदान लाभले. उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागाचे डॉ. सुभाष शेळके, कर्मचारी अंकुश बळगानुरे, चारुशीला पेटकर,यांनी हे लसीकरण पार पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा