एकमेकांची उणीदुणी काढू नका,भगव्या छताखाली एकत्र या - तानाजी सावंत यांचे शिव सैनिकांना आवाहन.
उस्मानाबाद (प्रतिनिधी) उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातून येणाऱ्या गरजू गरजवंतांना कशाप्रकारे मदत करता येईल यासाठी दक्ष राहावे. शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमेकांची उणीदुणी न काढता भगव्या छताखाली एकत्र यावे असे आवाहन शिवसेनेचे भूम-परंडा-वाशी आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी केली आहे. उस्मानाबादेत १६ नोव्हेंबरला शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर ते बोलत होते. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख अनिल खोचरे, जिल्हा परिषदेचे कृषी पशुसंवर्धन सभापती दत्ता साळूंखे भूम नगरपालिकेचे गटनेते संजय गाढवे, दिलीप जावळे,भीमा जाधव,गोविंद कोळगे, अभिजित देशमुख,सतीश सोमाणी यांचेसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
उस्मानाबाद येथील पोलिस वसाहती समोर शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय सर्वसामान्य जनतेसाठी आमदार डॉ.तानाजी सावंत यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे. ते म्हणाले आडले नडलेल्या जनतेची कामे करण्यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी मदत करण्याची महत्वपूर्ण भूमिका बजवावी. हे काम करताना माझी बरोबरी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.कारण मी पक्षाचा पाईक आहे. पक्षनिष्ठा मला कोणीही शिकवायची गरज नाही. काही प्रकार माझ्या निदर्शनास आल्यास मी कोणाला सोडणार नाही नाही.मात्र अशी वेळ कोणावरही येऊ नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. आगामी काळात सर्वत्र भगवा फडकवण्यासाठी सर्वांनी एका छताखाली यावे असे आवाहन त्यांनी केले. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अनिल खोचरे यांच्या कार्याचा देखील त्यांनी गौरव केला.या पुढील काळात त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात भगवे वादळ निर्माण करण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहनही डॉ.सावंत यांनी केले.
दरम्यान मध्यवर्ती संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी सोयाबीनची बँकेतील रक्कम चोरीला गेल्याची व्यथा मांडण्यासाठी केशेगाव येथील श्रीशैल वाघाळे यांनी डॉ.तानाजी सावंत यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि लागलीच त्यांना आर्थिक मदत देखील केली. बोलल्याप्रमाणे शब्दाला जागण्याची समयसूचकता त्यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना कृतीतून दाखवून दिली.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा