वाढदिवसा निमित जि.प.केंद्रीय प्रथमिक कापसी (बु) शाळेतील विद्यार्थाना शालेय साहित्य वाटप
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा: कापसी (बु) ता.लोहा येथील ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार नागेश पाटील वडवळे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावातील जेष्ठ नागरिक गोविंद जहागिरदार
यांची उपस्थिती होती शालेय साहित्याचे वाटप राजू पाटील वडवळे, संतोषराव वडवळे,गणेश वडवळे (उपसरपंच),शिवाजी आळणे,(सरपंच),प्रा. तुकाराम जाधव,वैजनाथ घागरदरे,व्यंकटेश सिरसाट आदीच्या हस्ते विद्यार्थ्यांना करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमासाठी गावातील केशव वडवळे, श्रीकांत वडवळे,आनंद वडवळे,परसराम मिस्त्री,शिवाजी सुपलवार,ज्ञानेश्वर वडवळे,बळवंत वार्ताळे, नितिन वडवळे,जयराम तेलंग ,विष्णु तेलंग,पवन वडवळे, शाळेचे मुख्याध्यापक आर.एस.बेरळीकर,शिक्षक बैलके सर,वर्ताळे,पवार, डूडलेवार , कल्याणी मँडम ,वाईकर,देशमुख,मठमवार,पतेवार आदिंसह शाळेतील विद्यार्थ्यांसह गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा