*तुळजापूर डान्सबारवर पोलिसांची छापा, २५ महिलासह ६४ पुरुष पोलिसांच्या ताब्यात*
तुळजापूर :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या पुण्य पावन नगरीत स्त्री शक्ती असलेल्या सुरु असलेल्या डांस बार छम छम मध्ये पोलिसांचा छापा एकिकडे राज्यात डान्स बारला बंदी असताना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापुरात खुलेआम डान्स बार सुरू झाला होता. तुळजापुरच्या इतिहासात प्रथमच डान्स बार सुरू झाल्याने थेट पोलीस यंत्रणेला एकप्रकारे आव्हान दिले होते. तुळजापूर शहरापासून काही अंतरावर रेस्टॉरंट व बारमध्ये डीजेच्या तालावर बारबाला नाचवीत डान्स बारची सुरुवात करण्यात आली होता मात्र पोलिस अध्यक्षक नीवा जैन यांच्या आदेशाने उस्मानाबाद दलाच्या विषेश पथकाने उपविभागीय पोलिस अधिकारी एस. रमेश यांच्या पथकाने मुद्देमालासह रोख रखमेसह ६२ लाख ८३ हजार पाचसे रुपये जप्त केले.
अर्धनग्न अवस्थेत अश्लील आणि बीभत्स डान्स सुरु असलेल्या डान्सबारवर उस्मानाबाद च्या विषेष पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. शहरातील हॉटेल गजगा बार अँड रेस्टॉरंट येथे अश्लील नृत्य सुरु असून काही जण चलनी नोटांची उधळण करत असल्याची माहिती
पोलिस प्रशास नासस मिळाली होती. या माहितीच्या आधारे हॉटेल गजगा या डान्सबारवर उस्मानाबाद पोलिस दलाच्या विशेष पथकाने छापा टाकून 25 महिलांसह 64 पुरुष, 2 मॅनेजर व मालकास अटक केली आहे. उस्मानाबादच्या पोलीस अधीक्षक नीवा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाने ही कारवाई करण्यात आली. कळंब विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी एस.रमेश, पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
छापा टाकला. यावेळी स्टेजवर २५ नृत्यांगना अर्धनग्न अवस्थेत अश्लील हावभाव करत बीभत्स डान्स करत होत्या. तर काहीजण हे त्यांच्यावर चलनी नोटांची उधळण करत होते. शहरात कोरोनाची स्थितीनुसार मनोरंजन कार्यक्रमास केवळ 50 टक्के मर्यादेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र या छम छम बार वर क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश दिल्याने कोरोनाच्या नियमांचे देखील उल्लंघन होत होते. डान्सबारमध्ये विभतस वर्तन करणे यासह रात्री उशिरापर्यंत नृत्य सुरु ठेवणे यासह इतर कारणामुळे कारवाई करण्यात आली आहे. तुळजापूर पोलीस ठाण्यात कलम १८८,२६८,२६९,२९४,३४ (w)१३१,२०१६,८ ( २ )८ (४) व ६५ (E) यासह अन्य कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा