*तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांचे,श्री तुळजाभवनी मातेला दंडवत,अभिषेक,व महाआरती करून साकडे*
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे बुलढाणा येथे मागील पाच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर जसे सोयाबीन व कापूस यांचा घसरलेला भाव,तसेच पिक विमा,2020-2021,अशा विविध मागण्या घेऊन अन्नत्याग उपोषण करत आहेत,त्यासाठी त्यांना बळ मिळावं, व केंद्र सरकार व राज्य सरकारला जाग यावी,तसेच त्यांना सूडबुद्धी द्यावी,यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी आज दि,२० नोव्हेंबर २०२१, रोजी श्री तुळजाभवानी मातेला ओल्या कपड्याने दंडवत घेऊन,अभिषेक व आरती केली, व रविकांत तुपकर यांची तब्येत बरी व्हावी यासाठी, श्री तुळजाभवानी मातेला साकडे घालण्यात आले, यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे,तालुका अध्यक्ष दुर्वास भोजने, संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, राजाभाऊ हाके,सह पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा