Breaking

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

सागाव-पाटीलपाडा परिसरातील आदिवासी गरजू लोकांना,दिवाळीनिमित्त मोफत साड्या,कपडे,चादरी,दिवाळी फराळ,व लहान मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आले."



" सागाव-पाटीलपाडा परिसरातील आदिवासी गरजू लोकांना,दिवाळीनिमित्त मोफत साड्या,कपडे,चादरी,दिवाळी फराळ,व लहान मुलांसाठी खाऊ वाटप करण्यात आले."



   महाड/ प्रतिनिधी       पाटीलपाडा-सागाव परिसरातील गरजू आदिवासी लोकांना दिवाळीनिमित्त, साड्या,कपडे,चादरी,दिवाळी फराळ,व लहान मुलांसाठी खाऊ व कपड्यांचे वाटप करण्यात आले.तत्समई सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.परिसरातील सर्व आदिवासी वाड्यांचा आबाळ वृद्धांसह सहभाग होता.सदर कार्यक्रमास हजाराच्या वर लोकांची उपस्थिती होती.

सर्व उपस्थितांस चहा,नाश्त्याची सोयही करण्यात आली होती.सदर कार्यक्रम रोटरी क्लब डोंबिवली ग्रामीण,बिरसा क्रांती दल,राष्ट्रीय आदिवासी संघटना व ग्रुप ग्राम पंचायत सागाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता.सदर कार्यक्रम हा आदि.कविता निरगुडे/हंबीर(आदिवासी महिला समाजसेविका),श्रीम.अपर्णा अनिल बोराडे(सरपंच,ग्रुप ग्राम पंचायत कार्यालय सागाव),आदि.चेतन बांगारे(बिरसा क्रांती दल राष्ट्रीय आदिवासी संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष) यांच्या पुढाकाराने आणि आयोजनामध्ये पार पडण्यात आला.सदर कार्यक्रमास मा.आमदार श्री.किसन कथोरे(मुरबाड विधानसभा मतदार संघ) यांच्या प्रमुख उपस्थितीसह,कविता निरगुडे/हंबीर,(आदिवासी समाजसेविका)अपर्णा बोराडे,(सरपंच),जान्हवी बोईको(रशियन समाजसेविका)नंदू परब,रमेश काटे,चेतन बांगारे,योगेश पाटील,अनिल बोराडे,गणेश कथोरे,राजेंद्र पाटील,रितेश माळी,गणेश पाटील,अँड.ब्रम्हा माळी,प्रशांत काखांडगी,रमेश सबनीस,नंदकुमार पाटील,सागर तोडकर(अभिनेता),अशोक काजले(गायक संगीतकार),महेश गडा,हरीचंद्र पाटील,भावेश म्हात्रे,रुपेश पाटील,चिंतामण जावळे,दीपक म्हात्रे,गणेश कथोरे,प्रा.रघुनाथ हंबीर,दिगेश पवार,अँड.रोहिदास भंडारी,गौतम खिल्लारे,संदीप भगत,यशवंत कथोरे,संजय भोईर,एकनाथ पादारे,हरी जाधव,आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा