Breaking

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

सुजाता व दिलीपराव ढोले दाम्पत्याचे कोरोना काळातील कार्य आदर्श त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे- ना एकनाथ शिंदे



सुजाता व दिलीपराव ढोले दाम्पत्याचे कोरोना काळातील कार्य आदर्श त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कोरोना योद्धे- ना एकनाथ शिंदे


फलटण (प्रतिनिधी)-  प्रशासकीय सेवेमध्ये प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या ढोले दांपत्याचे कोरोना काळातील कार्य अत्यंत प्रेरणादायी व जनसामान्यांना न्याय देणारे असल्याने ढोले दाम्पत्य खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा असल्याचे मत राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई व डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन ठाणे यांच्यातर्फे ठाणे येथील डॉक्टर काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता
सदरचा कोरोना योद्धा पुरस्कार फलटणच्या कन्या नवी मुंबईच्या अतिरिक्‍त आयुक्‍त सुजाता खाडे- ढोले व त्यांचे पती मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीपराव ढोले यांना देण्यात आला त्यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते
 यावेळी राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, विधी व न्याय राज्यमंत्री आदिती तटकरे ,खासदार श्रीकांत शिंदे ,शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आदी उपस्थित होते
कोरोना काळामध्ये दिलीपराव ढोले व सुजाता ढोले यांनी वेळेचे बंधन न पाळता दिवस-रात्र लोकांच्या सेवेसाठी वाहून घेतले होते प्रशासकीय यंत्रणा त्यांनी गतिमान केली होती सुट्टी न घेता त्यांचे कामकाज सुरू होते रुग्णांना उपचार तसेच आपल्या क्षेत्रामध्ये स्वच्छता आरोग्य या गोष्टीवर त्यांनी बारकाईने लक्ष दिल्याने जनसामान्यांमध्ये या दांपत्याबद्दल आपुलकीची भावना आहे प्रेम आहे जनतेच्या मनातील ते खरे नायक आहेत त्यामुळेच खऱ्या अर्थाने ते कोरोना योद्धा पुरस्कारासाठी हकदार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले व या पुरस्काराबद्दल ढोले दाम्पत्याचे अभिनंदन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा