*महाळुंगमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त बाल संजीवनी अभियानाची सुरुवात*
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने *एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अकलूज व आरोग्य विभागातर्फे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली 16 नोव्हेंबर ते 22 डिसेंबर 2021 दरम्यान* स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बाल संजीवनी अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या *बाल विकास प्रकल्प अधिकारी श्रीमती रिता चव्हाण* यांनी विभाग महाळुंग येथील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी दिली आहे या अभियानाचा मूळ हेतू बालमृत्यूच्या कारणांचा शोध घेऊन बालमृत्यूला आळा घालणे, प्रत्येक बालकास जीवन जगण्याचा नैसर्गिक अधिकार देणे , बालमृत्यूचे प्रमाण कमी करून लिंग गुणोत्तर वाढीस लावणे हा असून 16 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर पर्यंत चालू असणाऱ्या या कालावधीमध्ये बालमृत्यू रोखण्यासाठी विविध कार्यक्रम प्रत्येक भागातून घेण्यात येणार आहेत. यात *प्रबोधनपर कार्यक्रम, तपासणी शिबीर, मार्गदर्शनपर कार्यक्रम,बालकांची आरोग्य तपासणी, गरोदर व स्तनदा मातांचे समुपदेशन व तपासणी* असे विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
विभाग महाळुंग येथील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बाल संजीवनी *अभियानाची सुरुवात बालकांना थोर महापुरुषांचे वेशभूषा परिधान करून त्यांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती देऊन करण्यात आली.* याप्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे *वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख व डॉक्टर गायकवाड* यांची उपस्थिती कार्यक्रमास होती.
अभियानाविषयी अधिक माहिती देताना श्रीम.चव्हाण यांनी सांगितले की महिलांना आहार ,आरोग्य व स्वच्छता विषयी माहिती देवून अभियानादरम्यान महिलांची आरोग्य तपासणी तसेच दुर्धर बालकांची तपासणी गरोदर माता व स्तनदा माता एचबी तपासणी आरोग्य तपासणी बाळाचे 1000 दिवसा बाबत मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
अभियानामुळे कोठेही बालमृत्यू होणार नाही यासाठी दक्षता व समुपदेशन यावर भर देण्यात येणार आहे. देशाची भावी पिढी आरोग्यदायी व सुदृढ करण्यासाठी हे अभियान मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. स्वामी साहेब, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. शेख साहेब व गटविकास अधिकारी श्री. खरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले आहे
याप्रसंगी कार्यक्रमास विभाग महाळुंग येथील सर्व अंगणवाडी सेविका, पालक वर्ग ,माता ,आशा वर्कर इत्यादी उपस्थित होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा